Rahul Shewale : शिवसेना खासदार राहुल शेवाळेंविरोधात बलात्काराची तक्रार, पीडित महिलेने लावली सीडी

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतेच शिंदे गटात जाऊन बंडखोरी केली आहे. शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. तसेच पीडित महिलेने या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय मागितला आहे. या महिलेने ट्विटवर दोन व्हिडीओ पोस्ट करून तक्रार केल्याचे म्हटले आहे. 

rahul shewale
राहुल शेवाळे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतेच शिंदे गटात जाऊन बंडखोरी केली आहे.
  • शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.
  • तसेच पीडित महिलेने या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय मागितला आहे.

Rahul Shewale : मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Shivsena MP Rahul Shewale) यांनी नुकतेच शिंदे गटात जाऊन बंडखोरी केली आहे. शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप (Rape Complaing) केला आहे. तसेच पीडित महिलेने या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे न्याय मागितला आहे. या महिलेने ट्विटवर (twitter) दोन व्हिडीओ पोस्ट करून तक्रार केली आहे. (rape complaint against shivsena mp rahul shewale video viral )

अधिक वाचा : ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी दरवाजे अजून खुले आहेत : आदित्य ठाकरे

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका ३३ वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. ही महिला दुबईची रहिवासी असून शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार केला असून मानसिक छळ आणि धोका दिल्याचा आरोप केला आहे. तसेच २०२० साली शेवाळे यांनी या महिलेला लग्न करण्याचे वचन दिले होते. परंतु तेव्हापासून शेवाळे आपल्याला फसवत असल्याचे या महिलेने म्हटले आहे. 

अधिक वाचा : कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे १०० कोटी रुपयांची मागणी, ४ जणांना अटक

या महिलेने साकीनाका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेवाळे यांनी महिलेला सांगितले की त्यांचे आणि पत्नीचे संबंध चांगले नाही. लवकरच घटस्फोट घेऊन लग्न करू असे वचन शेवाळे यांनी या महिलेला दिले होते. परंतु तेव्हापासून आपल्याला फक्त शेवाळे यांनी धोका दिला आहे. या प्रकरणी महिलेने साकीनाका पोलीस स्थानकात तक्रार दिली. परंतु शेवाळे यांचे राजकीय लागेबंधे असल्याने शेवाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही असे या महिलेने म्हटले आहे. या महिलेने साकीनाका पोलिसांकडे रीतसर तक्रार आणि पुरावे असलेली सीडी सुपुर्द केल्याचेही म्हटले आहे. 

अधिक वाचा : लक्षात ठेवा..., धनुष्य माझ्याकडेच; खासदारांच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

या महिलेचा युएईमध्ये व्यवसाय आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार युएईमध्ये शेवाळे यांनी पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली, त्यामुळे या महिलेला तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगातून सुटून ही महिला भारतात परतली. शेवाळे यांच्यामुळे आपला व्यवसाय बंद पडला  तसेच शेवाळे यांच्यामुळे आपली खूप बदनामी झाल्याचेही या महिलेने म्हटले आहे.

अधिक वाचा : किती आमदार, खासदार आले पण...., पूर परिस्थितीचा आढावा घ्यायला गेलेल्या उपमुख्यमंत्र्यांना महिलांनी घातला घेराव

शेवाळे यांच्या पत्नीने दिले स्पष्टीकरण

तर दुसरीकडे राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सदर महिलेने लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. तसेच ही महिला आमच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करत असून तिच्याविरोधात अंधेरी कोर्टात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तसेच साकीनाका पोलिसांत ११ जुलै २०२२ रोजी या महिलेविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती कामिनी शेवाळे यांनी दिली.

अधिक वाचा :  संजय राऊतांना दुसऱ्यांदा EDचा समन्स, उद्या पुन्हा होणार चौकशी

महिलेने व्हिडीओ केले पोस्ट 

या महिलेने ट्विटवर राहुल शेवाळेंसोबतचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. राहुल शेवाळे या महिलेसोबत लिफ्टमध्ये जात असतानाचे आणि बर्थडे सेलिब्रेशन करत असतानाचे व्हिडीओ पोस्ट केले असून हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी