Rare Coin : तुमच्याकडे असलेल्या जुन्या नाण्याची किंमत असेल कोटी रुपयांत, अशा प्रकारे जाणून घ्या खरी किंमत

जर तुमच्याकडे एखादा जुने नाणे असेल तर तुम्ही कोट्यधीश होऊ शकता अशा बातम्या तुम्ही खूप वेळा वाचल्या असतील. अशा वेळी आपण लगेच घरातील जुनी नाणी शोधायला निघतो. हे वृत्त जरी खरे असले तरी अशा प्रकारे जुन्या नाण्यांची किंमत आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक असते.  rare coin price may in crore rupees how to know tips

rare currency
दुर्मीळ नाणे 
थोडं पण कामाचं
  • जुन्या नाण्यांची किंमत आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक असू शकते. 
  • एखाद्या जुन्या नाण्यासाठी किंवा एखाद्या नोटसाठी लाखो रुपये मिळतात.
  • एक नाणे एका लिलावात २ कोटी डॉलर्समध्ये विकले गेले होते.

Rare Coin : मुंबई : जर तुमच्याकडे एखादा जुने नाणे असेल तर तुम्ही कोट्यधीश होऊ शकता अशा बातम्या तुम्ही खूप वेळा वाचल्या असतील. अशा वेळी आपण लगेच घरातील जुनी नाणी शोधायला निघतो. हे वृत्त जरी खरे असले तरी अशा प्रकारे जुन्या नाण्यांची किंमत आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक असू शकते. 

एखाद्या जुन्या नाण्यासाठी किंवा एखाद्या नोटसाठी लाखो रुपये मिळतात. जून महिन्यात अशाच एका प्रकारे एका नाण्याची बातमी समोर आली होती. हे नाणे एका लिलावात २ कोटी डॉलर्समध्ये विकले गेले होते.

या नाण्यावर दोन गरुड होते. अमेरिकेत १९३३ साली हे नाणे जाहीर झाले होते. हे नाणे सोन्याचे होते आणि चलनात येण्यापूर्वीच सरकारने त्यावर बंदी आणली होती.

आजही काही जुनी नाणी लोकांकडे आहेत आणि त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. गुंतवणुकदार अशी नाणी विकत घेण्यास उत्सुक असतात. एखाद्या विशिष्ट घटनेशी संदर्भ असलेला किंवा विशिष्ट कार्यकाळातील चलनाला मोठी किंमत असते. तसेच दुर्मीळ असलेल्या नाण्यांनाही मोठी बोली लावली जाते.
 

दुर्मीळ नाणे आणि नोट

अमेरिकेत एका लिलावात २० डॉलरच्या नोटेला ५७ हजार डॉलरहून अधिक बोली लागली होती. नोट छपाईदरम्यान कागदावर चुकून एक स्टीकर पडले होते आणि हे स्टीकर नोटेवर छापले गेली होते. एका विद्यार्थ्याला एटीएममधून पैसे काढताना ही नोट मिळाली होती. 

छपाई दरम्यान चुकलेल्या नोटेला obstructed error notes म्हणतात. अशा प्रकारची नोट दुर्मीळ असते. कारण छपाईदरम्यान चूक झालेल्या या नोटा किंवा नाणी नष्ट केल्या जातात. जर अशा प्रकारची नोट किंवा नाणी चलनात आलीच तर ती मूल्यवान समजली जाते. एका नोट किंवा नाण्यावर केवढी मोठी चूक झाली आहे यावर त्याची किंमत ठरली जाते.  

खास व्यक्तीशी निगडीत दुर्मीळ नाणे 

१९३३ साली भारताचे तत्कालीन गव्हर्नर जे.डब्ल्यु.कॅली यांची सही असलेल्या १ रुपयाच्या नोटला लोक मोठी किंमत द्यायला तयार आहे. तसेच १९४३ साली सी.डी.देशमुख रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांची सही असलेल्या १० रुपयांच्या नोटलाही मोठी किंमत मिळू शकते. अतिशय कमी कालावधीसाठी झालेल्या अधिकार्‍याची सही किंवा एखादा राजा ज्याने आपल्या कारकीर्दीत मोठी कामगिरी बजावली असेल त्याने जारी केलेल्या नाण्याला बाजारात मोठी किंमत मिळते.  
 

जाणकारांची मदत घ्या

दुर्मीळ नाण्याची किंमत मागणी आणि पुरवठ्यावर विसंबून असते. तसेच त्या देशाचा कायदा, नाणी किती दुर्मीळ आहेत, नाणी आणि नोटांची स्थिती यावरही त्यांची किंमत ठरवली जाते. प्रत्येक देशात दुर्मीळ वस्तू आणि नाण्यांची एक व्याख्या ठरवण्यात आली आहे. जो कोणी या वस्तूंची खरेदी विक्री करतात त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. असे असले तरी याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे असलेल्या जुन्या नाण्यांना काहीच किंमत नाही. जर तुमच्याकडे अशा प्रकारची जुनी नाणी किंवा नोट असेल तर जाणकारांशी याबाबत चर्च करा. कुणी सांगावं तुमच्याकडे असलेल्या नाण्याची किंमत तुम्हाला वाट असलेल्या किंमतीपेक्षा जास्त असावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी