Rashmi Shukla, who became controversial in the phone tapping case, has been given the rank of Director General of Police : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या आणि फडणवीस यांचे समर्थन मिळवणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना महासंचालकपदाचा (Director General of Police or DGP) दर्जा देण्यात आला आहे. अतुलचंद्र कुलकर्णी आणि सदानंद दाते यांनाही पोलीस महासंचालकपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेटने या निर्णयाला शनिवार 11 फेब्रुवारी 2023 रोजी मंजुरी दिली.
याआधी जानेवारी 2023 मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी देण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात पहिल्यांदाच एक नवे पद तयार करण्यात आले. देवेन भारती यांना मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त या पदावर नियुक्त करण्यात आले. ही नियुक्ती होण्याआधी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त अशी पदे होती. पण देवेन भारती यांच्या नियुक्तीसाठी नव्या पदाची निर्मिती करण्यात आली. देवेन भारती यांना मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त करण्याआधीच फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट देण्यात आली होती. या निर्णयांमुळे राज्याच्या राजकारणातले फडणवीसांचे महत्त्व अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख, आमदार बच्चू कडू यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला होता. पण शिंदे-फडणवीस सरकारने या गुन्ह्याचा तपास थांबवून पुणे कोर्टात क्लोझर रिपोर्ट सादर केला. यानंतर काही आठवड्यांतच रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती पोलीस दलात महत्त्वाच्या पदावर होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर देवेन भारती यांची वाहतूक विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती झाली. आता शिंदे-फडणवीस सरकारला सहा महिने झाल्यानंतर देवेन भारती यांच्याकडे एकदम मोठी जबाबदारी आली आहे. याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते.
Amrit Udyan मध्ये हे बघाल तर चक्रावून जाल
मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस रुट, तिकीट, टाईमिंग, बुकिंग ते सर्वकाही जाणून घ्या
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.