राऊतांनी बंडखोर आमदारांना त्यांच्या व्यवासायावरुन हिणवलं, शिंदे सरकारनं त्या व्यवसायाचं केलं कल्याण

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 19, 2022 | 19:41 IST

राज्यात राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी सुरू आहेत. आमदारांसोबत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना एकामागून एक धक्के मिळत आहेत. आमदारांच्या गळतीनंतर शिंदे गटाकडे जाण्यासाठी  नगरसेवक, पदाधिकारी आणि आता खासदारांची रीघ लागली आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आमदारांच्या त्यांच्या मागील पेशा, व्यावसायावरुन टीका केली आहे.

Uday Samant
रिक्षा-टॅक्सी चालक, पानवाला संघटनेसाठी कल्याणकारी मंडळ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेसोबत पानवाला, वॉचमन, तसेच वेश्याव्यवसाय करणा-यांसाठी कल्याणकारी मंडळांची स्थापना
  • आधी रिक्शा चालकमालक व टॅकशी चालक-मालक संघटना कल्याणकारी मंडळ स्थापलं जाणार

नवी दिल्ली : राज्यात राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी सुरू आहेत. आमदारांसोबत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना एकामागून एक धक्के मिळत आहेत. आमदारांच्या गळतीनंतर शिंदे गटाकडे जाण्यासाठी  नगरसेवक, पदाधिकारी आणि आता खासदारांची रीघ लागली आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आमदारांच्या त्यांच्या मागील पेशा, व्यावसायावरुन टीका केली आहे. आता शिंदे सरकारने तोच धागा पकडत त्या व्यावसायिकांसाठी मोठ निर्णय घेतला आहे. 

आता राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात लवकरच रिक्षा-टॅक्सी चालकमालक संघटना कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी एका माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली. 
शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेना साथ दिली. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आमदारांवर सडकून टीका  केली. गुलाबराव पाटील यांची पानपट्टीवाला, तर संदीपान भुमरे यांचा वॉचमॅन असा उल्लेख, करत टीका केली होती. तर वेश्या अशीही टीका केली. ही टीका एकनाथ शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे आता रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेसोबत पानवाला, वॉचमन, तसच वेश्याव्यवसाय करणा-यांसाठी कल्याणकारी मंडळांची स्थापना केली जाईल अशी माहितीही सामंत यांनी दिली.

उदय सामंत काय म्हणाले?  

"शिंदे गटावर खालच्या पातळीवर टिका करण्यात आली. रिक्शावाला, पाणवला,वाचमन, वैशा व्यवसाय, असे बोलण्यात आले. ती टिका जिव्हारी लागली त्याचे उत्तर आम्ही या सर्व घटाकांसाठी मंडळ काढून या घटकांचा विकास करणार आहोत, अशी घोषणा सामंतांनी केली.
"आधी रिक्शा चालकमालक व टॅकशी चालक-मालक संघटना कल्याणकारी मंडळ स्थापना करणार. राज्यात जवळपास साडेआठ लाख रिक्शा तर एक लाख तीस हजार टॅक्सी आहेत. त्या सर्वांना यात सामील करणार आहोत.

या माध्यमातून अनेक पद्धतीची मदत आम्ही देणार आहोत. या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी, महिलांच्या प्रसूतिसाठी आर्थिक मदत, 60 वर्षवरील लोकाना पेन्शन, नविन वाहन घेण्यासाठी आर्थिक मदत, इन्शुरन्स आणि इस्पितल मदत मिळणार असल्याचंही सामंतांनी नमूद केलं. यानंतर पानवाला, वॉचमन आणि वेशव्यावासायिंकासाठीही मंडल काढणार असल्याचेही सामंतांनी सांगितलं. दरम्यान या घोषणेनंतर रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी