मुंबई : एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गेले आहे. ते काही गैरसमजातून गेले आहे. ते आमच्या संपर्कामध्ये आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहेत, पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. ज्याप्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख संजय राऊत यांनी केला आहे.असं म्हणत असताना राऊतांनी शिंदेंना सूचक इशारा ही दिला आहे. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. पदांसाठी आणि सत्तेसाठी विकली जाणारी शिवसेना नाही. शिवसेनेवर वार म्हणजे महाराष्ट्रावर वार आहे. त्यामुळे शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही. असे जे कोणी निर्माण झाले त्यांची अवस्था तुम्ही पाहातच असाल, असे वक्तव्य करत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुजरातला पोहोचल्यानंतर खळबळ उडाली. अखेर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये असलेल्या काही आमदारांशी आमचा संपर्क झाला आहे. तसेच शिंदेसोबत गेले म्हणून सांगण्यात येत असलेले शिवसेनेचे अनेक आमदार मातोश्रीवर दाखल झाले आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश असल्याचे राऊत यांनी सांगितले.
Read Also : सत्तेचा प्रस्ताव कोण सोडेल, चंद्रकांतदादांचा सवाल
एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गेले आहे. ते काही गैरसमजातून गेले आहे. ते आमच्या संपर्कामध्ये आहे. एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईच्या बाहेर आहे, पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. ज्या प्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद वातावरण तयार झाले आहे. वर्षा बंगल्यावर बैठकीला जाणार आहोत, असं राऊत म्हणाले. शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात सगळे नेते संपर्कात आहे. महाराष्ट्रात राजस्थान, मध्यप्रदेश पॅटर्न लागू करून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.पण महाराष्ट्रात हे होणार नाही. महाराष्ट्रावर घाव घातला जात आहे, पण शिवसेना तसं होऊ देणार नाही. शिवसेनेवर हल्ला करण म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
Read Also : एकनाथ शिंदेंचा आनंद दिघे झाला असता - राणे
मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी हे छळयंत्र सुरू आहे. शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. जे बाहेर पडले त्यांची अवस्था सर्वांनी पाहिली आहे. आईच दुध विकणारी औलाद शिवसेनेत निर्माण होणार नाही. जे नावं मीडियात दाखवली जात आहे. त्यातील बरीच आमदार हे आमच्या संपर्कामध्ये आहे. संजय राठोड , प्रताप सरनाईक हे वर्षावर दाखल आहे, असं राऊत म्हणाले. जे आमदार सुरतमध्ये आहे त्यांची व्यवस्था भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी केली आहे. त्यांना गुजरातला का नेण्यात आलं, सुरतमध्येच का ठेवण्यात आले आहे. आणि ते कुणाच्या जवळ आहे हे सर्वांना माहिती आहे, असं राऊत म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.