महाराष्ट्रातील हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत - नितेश राणे

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 13, 2021 | 12:36 IST

Raza Academy responsible for violence in Maharashtra says Nitesh Rane त्रिपुरातील कथित घटनेचे निमित्त पुढे करुन महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंसा करण्यात आली. महाराष्ट्रातील या हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. 

Raza Academy responsible for violence in Maharashtra says Nitesh Rane
महाराष्ट्रातील हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत - नितेश राणे 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत - नितेश राणे
  • ट्वीट करुन नितेश राणेंनी रझा अकादमीवर महाराष्ट्रात हिंसा केल्याचा आरोप केला
  • शुक्रवारी मालेगाव, अमरावती या भागात  मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ

Raza Academy responsible for violence in Maharashtra says Nitesh Rane । मुंबईः त्रिपुरातील कथित घटनेचे निमित्त पुढे करुन महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंसा करण्यात आली. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची नासधूस करण्यात आली. शुक्रवारी मालेगाव, अमरावती या भागात  मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. महाराष्ट्रातील या हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. 

ट्वीट करुन नितेश राणेंनी रझा अकादमीवर महाराष्ट्रात हिंसा केल्याचा आरोप केला. रझा अकादमी या दहशतवादी संघटनेने महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंसाचार घडवून आणला. प्रत्येक वेळी ही संघटना कायदा मोडते आणि राज्य सरकार नुसते बघत बसते. या संघटनेवर राज्य सरकारने बंदी आणावी नाहीतर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला या संघटनेला संपवावे लागेल, असे नितेश राणे म्हणाले.

शुक्रवारी मालेगाव, अमरावती या भागात  मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांवर दगडफेक झाली. मालेगावमध्ये दहा पोलीस जखमी झाले. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी