Aaditya Thackeray News: एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना महाराष्ट्र सरकारमधून बाहेर पडली असली तरी आता ठाकरे कुटुंब पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. उध्दव ठाकरे पक्षाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्यांची शिवसेना भवनात बैठक घेत आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे बंडखोर आमदार खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी वडाळ्यातील शिवसेना शाखेस भेट दिली. येथील शिवसैनिकांशी संवाद साधत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पण त्यांनी भरपावसात सभा घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४० आमदारांसह 12 खासदारांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी आपापल्या भागात जाऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संवर्गातील ही साशंक स्थिती दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मोर्चेबांधणी केली असून ते निष्ठा यात्रा काढत आहेत.
या निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे बंडखोर खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघातील शिवसेनेच्या शाखांनाही भेट देत आहेत. यावेळी ते गटप्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. या निष्ठा यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सेनेतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.