Mumbai Railway Megablock : रेल्वेप्रवास करण्याआधी वाचा ही बातमी, मुंबई उपनगरीय रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 26, 2023 | 08:33 IST

Read this news before traveling by train, Megablock of Mumbai Suburban Railway : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आज (रविवार 26 फेब्रुवारी 2023) मेगाब्लॉक आहे.

Megablock of Mumbai Suburban Railway
मुंबई उपनगरीय रेल्वेचा मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रेल्वेप्रवास करण्याआधी वाचा ही बातमी
  • मुंबई उपनगरीय रेल्वेचा मेगाब्लॉक
  • रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

Read this news before traveling by train, Megablock of Mumbai Suburban Railway : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आज (रविवार 26 फेब्रुवारी 2023) मेगाब्लॉक आहे. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या विलंबाने धावत आहेत. आज रेल्वे प्रवास करणार असाल तर हे बदल जाणून घेऊन प्रवासाचे नियोजन करा.

चाळीशीनंतर स्टॅमिनासाठी पुरुषांनी खायचे पदार्थ

कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा

मेगाब्लॉक

अ. मध्य रेल्वे : मुख्य मार्ग (मेन लाईन) : माटुंगा ते मुलुंड 

मार्ग : अप आणि डाऊन धीमा (स्लो)

वेळ : सकाळी 11 ते दुपारी 3.55 पर्यंत

परिणाम : ब्लॉक काळात धीम्या (स्लो) लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद (फास्ट) मार्गावर वळवण्यात येतील. या फेऱ्या जलद (फास्ट) मार्गावरील थांब्यावर नियोजित थांब्यावर थांबतील. काही फेऱ्या रद्द राहणार असल्याने काही फेऱ्यांची वाहतूक विलंबाने होणार आहे.

ब. हार्बर रेल्वे : पनवेल ते वाशी

मार्ग : अप-डाऊन जलद/धीमा आणि पाचवी-सहावी मार्गिका

वेळ : सकाळी 11.05 ते दुपारी 04.05 पर्यंत

परिणाम : ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी मुंबई) ते पनवेल/बेलापूरदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द राहणार आहेत. ठाणे ते पनवेल अप-डाऊन फेऱ्यादेखील रद्द होणार आहेत. मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. बेलापूर ते खारकोपर आणि नेरळ ते खारकोपरदरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

क. पश्चिम रेल्वे : सांताक्रुझ ते गोरेगाव

मार्ग : अप आणि डाऊन जलद (फास्ट)

वेळ : सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत

परिणाम : ब्लॉक काळात जलद (फास्ट) मार्गावरील फेऱ्या धीम्या (स्लो) मार्गावर वळविण्यात येणार आहेत. काही बोरिवली लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल फेऱ्यांची वाहतूक विलंबाने होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी