बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी शिवसेना : केसरकर

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 12, 2022 | 19:10 IST

Real Shiv Sena which upholds Balasaheb's thoughts says Kesarkar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जे जपत आहेत तेच खरी शिवसेना आहेत असे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

Real Shiv Sena which upholds Balasaheb's thoughts says Kesarkar
बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी शिवसेना : केसरकर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी शिवसेना : केसरकर
  • राज्याच्या मंत्रिमंडळाचा भविष्यात योग्य वेळी विस्तार होईल
  • मंत्रिमंडळात सध्या महिला नाही पण योग्य वेळी याबाबतचा निर्णय होईल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जे जपत आहेत तेच खरी शिवसेना आहेत असे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

शिर्डी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. यामुळे शिर्डीतील क्राइम रेट कमी होणे आवश्यक आहे. एकदा खातेवाटप जाहीर झाले की या मुद्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांशी बोलणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले. राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप लवकरच जाहीर होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

राज्याच्या मंत्रिमंडळाचा भविष्यात योग्य वेळी विस्तार होईल. आमच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असलेल्यांचा मान राखला जाईल. अपक्ष असलेल्या आमदारांनाही ते आमच्या सोबत आहेत त्यामुळे मान मिळेल, असे केसरकर म्हणाले. 

एका मंत्र्यावर आरोप झाले पुढे त्यांना क्लीन चीट मिळाली आणि आता ते पुन्हा मंत्री झाले आहेत. पण अजूनही कोणी आरोप करत असेल अथवा काही शंका उपस्थित करत असतील निःपक्षपाती चौकशी होईल. पण ज्या व्यक्तीला आधी क्लीनचीट मिळाली आहे अशा व्यक्तीला नव्याने कोणताही आरोप झाला नसताना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची गरज नाही; असे केसरकर म्हणाले. त्यांनी संजय राठोड यांच्या पाठिशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदार ठामपणे उभे असल्याचे संकेत दिले.

मंत्रिमंडळात सध्या महिला नाही पण योग्य वेळी याबाबतचा निर्णय होईल. पंकजा मुंडे यांनी सबुरी राखावी. मंत्रिमंडळाला कर्तबगार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाभले आहेत, असे केसरकर म्हणाले.

राज्याचे सरकार सुरळीतपणे काम करत आहे. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी कोणतेही महत्त्वाचे राजकीय कामकाज रखडलेले दिसत नाही. उलट आधीच्या सरकारच्या काळात काही बाबतीत थांबलेला तर काही बाबतीत मंदावलेला विकास पुन्हा एकदा गतीने सुरू झाल्याची माहिती केसरकर यांनी दिली. 

जनहित आणि पर्यावरण यात संतुलन राखून निर्णय घेतले जात आहेत. आरे कारशेड हे याचेच एक उदाहरण असल्याचे म्हणता येईल, असे केसरकर यांनी सांगितले. सामान्यांच्या हिताला प्राधान्य देत कामं सुरू आहेत आणि सुरू राहतील, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली. 

नाना पटोले यांनीच अनैसर्गिक युती असा उल्लेख केला. आमचेही तेच म्हणणे आहे. आता आम्ही पुन्हा एकदा मूळ सहकाऱ्यासोबत काम करत आहोत. सध्याच्या सरकारचे काम लोकांची मनं जिंकेल आणि पुढील निवडणुकीत विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याची किमया करून दाखवेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी