Eknath Shinde यांच्या बंडानंतर मध्यावती निवडणुकांचं स्वप्न पाहणाऱ्या BJP ला अजितदादांचा झटका

मुंबई
सुनिल देसले
Updated Jun 22, 2022 | 00:44 IST

Political crisis in Maharashtra: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. 

ajit pawar
सत्ता स्थापनेचं स्वप्न पाहणाऱ्या BJPचा अजितदादांनी केला गेम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण
  • अजित पवार यांचा भाजपला झटका, अनेक पदाधिकाऱ्यांना लावले गळाला

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काही आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरतमधील हॉटेलमध्ये (Surat Hotel) असल्याचं कळालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडी न करता भाजपसोबत युती करण्याचा प्रस्तावच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं वृत्त समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राज्यात आता पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून सत्ता स्थापनेसाठी आता एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांचा गट भाजपसोबत गेल्यास सहज भाजपची सत्ता येईल असं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात कमालीचं आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्यावती निवडणुकांचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एक मोठा झटका दिला आहे. अजित पवार यांनी भाजपला झटका देत काही नेत्यांना आपल्या गळाला लावलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील भाजपचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सभापती कैलासराव वाघचौरे, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकर, अहमदनगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मुंबईत शिवसैनिक आक्रमक

मुंबईत शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केली आहेत. मुंबईतील विविध भागांत शिवसैनिकांनी आंदोलन केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा केल्याचं दिसून आलं.

तर तिकडे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर या भावूक झाल्याचं पहायला मिळालं. भावूक झालेल्या किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी हात जोडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा आपल्या पक्षात येण्याचं तसेच भाजपच्या आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी