मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा मार्ग झाला मोकळा, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 09, 2020 | 15:48 IST

उद्धव ठाकरेंवरील हे राजकीय संकट आता दूर झालं आहे. राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कॅबिनेटकडून शिफारस करण्यात येणार आहे.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा मार्ग झाला मोकळा, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद अडचणीत आलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंवरील हे राजकीय संकट आता दूर झालं आहे. राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कॅबिनेटकडून शिफारस करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या नेतृत्वात कॉंग्रेस राष्ट्रवादीसह स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने एकमताने हा निर्णय घेतला. घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय झाला.

उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. संविधानाच्या कलम 164 (4) अंतर्गत उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात राज्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनणं अनिवार्य आहे. उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी 28 मे आधी विधीमंडळाचा सदस्य बनणं आवश्यक आहे. मात्र सध्या कोरोनाचं संकट पाहता ही विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या परिस्थितीत घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळात एकमताने घेण्यात आला. आता या शिफारशीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी निर्णय घेणार आहेत.

राज्यपाल नियुक्त रिक्त दोन जागा आहेत. त्यावर ठाकरे यांची नियुक्ती करावी, यासाठी आजची बैठक झाली की कॅबिनेट शिफारस करेल. यापूर्वी दोन जागांवर राष्ट्रवादीकडून आदिती नलावडे आणि गर्जे यांची नाव शिफारस केली होती. पण राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नव्हता. अशातच आता कॅबिनेटकडून एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे. तसंच त्यातल्या एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. लवकरच ते विधानपरिषदेचं सदस्यत्व स्वीकारतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी