MPSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच नोकरीसाठी (MPSC Job) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब करिता भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मान्यता दिली असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब करिता एकूण 1085 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून 17 जून 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 जून 2022
एकूण पदं – 1,085 पदं
सहायक विभाग अधिकारी
राज्य कर निरीक्षक
पोलीस उपनिरीक्षक
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा फी 544 रुपये असेल.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 344 रुपये परीक्षा फी असेल.
या भरती प्रक्रिये अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी त्यांनी एमपीएससीची अधिकृत वेबसाईटला mpsc.gov.in भेट देऊन अर्ज करावा.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.