Local trains fares | मुंबईतील लोकल ट्रेनच्या एसी, फर्स्ट क्लासच्या भाड्यात कपात...ऐन उकाड्यात घ्या एसीच्या गारव्याचा आनंद, पाहा नवे तिकिटदर

मुंबई
विजय तावडे
Updated May 02, 2022 | 15:54 IST

AC Local train new fares : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या एसी लोकल ट्रेनमध्ये 5 किलोमीटरच्या प्रवासासाठी 65 रुपये मोजणाऱ्या मुंबईकरांना 5 मेपासून 30 रुपये मोजावे लागणार आहेत. एसी लोकल ट्रेनचे भाडे जास्त आहे आणि ते कमी करण्यात यावे अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती.

Local train new fares for AC, First Class
एसी लोकल, फर्स्ट क्लाससाठीच्या तिकिटदरात कपात 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील एसी लोकल, फर्स्ट क्लासच्या तिकिटदरात कपात
  • 5 मेपासून नवीन तिकिटदर
  • नवीन तिकिटदरासंदर्भात रेल्वे बोर्डाने एक अधिसूचना जाहीर केली

Local train fares for AC, First Class : मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve)यांनी शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या एसी लोकल ट्रेनमध्ये 5 किलोमीटरच्या प्रवासासाठी 65 रुपये मोजणाऱ्या मुंबईकरांना 5 मेपासून 30 रुपये मोजावे लागणार आहेत. एसी लोकल ट्रेनचे भाडे जास्त आहे आणि ते कमी करण्यात यावे अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. एसी लोकलचे भाडे जास्त असल्याने इच्छा असूनही अनेक मुंबईकरांना त्यातून प्रवास करता येत नव्हता. मात्र आता एसी लोकलचे तिकिटदर कमी केल्याने मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात एसीच्या गारव्यातून प्रवास करता येणार आहे. (Reduction in Mumbai local train fares for AC, First Class slashed. Check new rates)

अधिक वाचा : Amruta Fadnavis: या मराठी अभिनेत्रीने दिली अमृता फडणवीसांना दिली म्हशीची उपमा

तिकिटदरात मोठी कपात

रेल्वे बोर्डाने एक अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार नवीन कमी केलेले भाडे 5 मे पासून लागू होईल. रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)- ठाणे येथून 34 किलोमीटरचे अंतर कापणाऱ्या ट्रेनचे भाडे सध्या 130 रुपयांवरून 90 रुपयांपर्यंत कमी केले जाईल. 54 किलोमीटर सीएसएमटी-कल्याण मार्गाचे भाडे 210 रुपयांवरून 105 रुपये कमी केले जाईल. चर्चगेट-बोरिवली दरम्यान 130 रुपयांवरून 90 रुपये आणि चर्चगेट-वसई रोडदरम्यान तिकिटदर 210 रुपयांवरून 105 रुपये करण्यात आला आहे.

अधिक वाचा :  ''रस्त्यावरील नमाज पठण बंदी केल्यानंतर गणेशोत्सवाचे काय?''

किमान 20%-30% भाडे कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला वारंवार सूचना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई विभागात दररोज 80 एसी लोकल चालवतात.

सर्वसामान्य प्रवाशांना लाभ

"सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, मी आणि आमचे मंत्री अश्विनी जी (railway minister Ashwini Vaishnaw)यांनी मुंबई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसी लोकल ट्रेनचे दैनंदिन एकल प्रवास भाडे 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला," असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुढे म्हणाले. उन्हाळ्याच्या उकाड्यात एसीने प्रवास करायला प्रत्येकालाच आवडते. मात्र उकाडा वाढत असला तरी एसी लोकलमधील प्रवाशांच्या संख्येत अपेक्षित वाढ झालेली नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन रेल्वेने एसी लोकलच्या तिकिटांच्या दरात मोठी कपात जाहीर केली आहे. यामुळे अधिकाधिक मुंबईकरांना एसी लोकलच्या गारव्याचा आनंद घेता येणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकिटांच्या दरात मोठी कपात केल्याचे जाहीर केले.

अधिक वाचा : देशात जाणीवपूर्वक धुव्रीकरण करण्याचे प्रयत्न; जनतेनं शांतता राखावी, गृहमंत्र्यांचं आवाहन

तिकिटांच्या दरांमध्ये पन्नास टक्क्यांची कपात झाल्यामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला. उन्हाळ्याच्या दिवसांत वाजवी दरात वेगाने प्रवास करण्यासाठी एसी लोकल हा एक सुरक्षित आणि सुखकर पर्याय आहे. यामुळे एसी लोकलला मिळणाऱ्या प्रतिसादात वाढ होईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मुंबई एसी लोकल, फर्स्ट क्लाससाठीच्या कमी केलेल्या नवीन तिकिटदराची संपूर्ण यादी पाहूया. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी