'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' आणि 'मैत्रेय' कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 25, 2021 | 19:09 IST

Refund to investors of Pancard Club Limited and Maitreya as per rules 'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' आणि 'मैत्रेय' या दोन कंपन्यांच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

Refund to investors of Pancard Club Limited and Maitreya as per rules
'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' आणि 'मैत्रेय' कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा 
थोडं पण कामाचं
  • 'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' आणि 'मैत्रेय' कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा
  • मालमत्तांची जप्ती आणि लिलाव ही प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करुन शक्य तितक्या लवकर गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा
  • आर्थिक गुन्हे शाखा नियमानुसार कारवाई करणार

Refund to investors of Pancard Club Limited and Maitreya as per rules मुंबईः 'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' आणि 'मैत्रेय' या दोन कंपन्यांच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तांची जप्ती आणि लिलाव ही प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करुन शक्य तितक्या लवकर गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा द्यावा, असे गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले. 

'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' विरोधात सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा, नाशिक, नवी मुंबई, नागपूर येथे गुन्हे दाखल आहेत. कंपनीवर सुमारे ५१ लाख गुंतवणुकदारांच्या फसवणुकीचा आरोप आहे. तर मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरूद्ध महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. 'मैत्रेय' कंपनीवर राज्यातील लाखो गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 'मैत्रेय' प्रकरणात एक जण फरार आहे तर एक जण तुरुंगात आहे. 

आर्थिक गुन्हे शाखेने 'पॅनकार्ड क्लब लिमिटेड' आणि 'मैत्रेय' या दोन कंपन्यांच्या प्रकरणात नियमानुसार पुढील प्रक्रिया करुन मालमत्ता लिलावात काढावी आणि संबंधित गुंतवणुकदारांना दिलासा द्यावा; असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी