Relief Fund Scam in KEM : खोट्या सह्या करून लुबाडला गरीब रुग्णांचा मदतनिधी, KEMच्या महिला कर्मचाऱ्याविरोधात FIR 

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 14, 2023 | 08:19 IST

Relief fund for poor patients looted by signing fake signatures in KEM Hospital Mumbai, FIR against KEM woman staff : मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये गरीब पेशंटच्या उपचार (ट्रीटमेंट) आणि ऑपरेशनसाठी असलेला मदतनिधी खोट्या सह्या करून लुबाडण्यात आला.

Relief Fund Scam in KEM
खोट्या सह्या करून लुबाडला गरीब रुग्णांचा मदतनिधी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • खोट्या सह्या करून लुबाडला गरीब रुग्णांचा मदतनिधी
  • KEMच्या महिला कर्मचाऱ्याविरोधात FIR 
  • पोलीस तपास सुरू

Relief fund for poor patients looted by signing fake signatures in KEM Hospital Mumbai, FIR against KEM woman staff : मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये गरीब पेशंटच्या उपचार (ट्रीटमेंट) आणि ऑपरेशनसाठी असलेला मदतनिधी खोट्या सह्या करून लुबाडण्यात आला. या प्रकरणात केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यरत महिला कर्मचारी सोनाली गायकवाड हिच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.

सोनाली गायकवाडने सहअधिष्ठाता, उपअधिष्ठाता यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून सुमारे 61 लाख रुपये लुटले होते. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी महिलेने औषध विक्रेत्यांकडून (मेडिकल स्टोअर) बनावट बिले घेऊन ती सादर केली. हा प्रकार समोर आल्यानंतर तिच्याविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

मुंबईच्या केईएममध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून पेशंट येत असतात. यापैकी काही रुग्णांच्या उपचारांचा खर्च मोठा असतो. रुग्णाच्या नातलगांची आर्थिक क्षमता एवढा मोठा खर्च उचलण्याची नसते. अशा परिस्थितीत हॉस्पिटल प्रशासन पेशंटच्या नातलगांना खर्चाचा अंदाज सांगणारे एक पत्र लेखी स्वरुपात देते. सोबतच पेशंट केईएममध्ये उपचारांसाठी आल्याचे पत्र नातलगांना दिले जाते. ही कागदपत्रे सादर करून पेशंटचे नातलग पंतप्रधान मदतनिधी, मुख्यमंत्री मदतनिधी, विविध स्वयंसेवी संस्था यांच्याकडे मदतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर मिळणारा मदतनिधी संबंधित पेशंटच्या उपचारांसाठी असा स्पष्ट उल्लेख करून थेट केईएमच्या अधिष्ठाता यांच्या खात्यात जमा केला जातो. अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर उपचारांसाठी जो खर्च होतो त्याची बिले बघून संबंधित पैसे थेट औषध विक्रेत्यांना देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी सोनाली गायकवाड यांची होती. या पदाचा गैरवापर करत सोनाली गायकवाड यांनी आर्थिक लुबाडणूक सुरू केली होती. पण 6 जानेवारी 2023 रोजी गायकवाड यांनी पेशंटशी संबंधित काही कागदपत्रे आणि बिले यांच्यावर बनावट सह्या केल्याचे सहायक अधिष्ठाता यांच्या लक्षात आले.

सहायक अधिष्ठाता यांनी इतर पदाधिकाऱ्यांशी या मुद्यावर चर्चा केली आणि संशय वाढल्यामुळे गायकवाड यांच्याकडे चौकशी केली. प्रश्न विचारताच गायकवाड यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण फार वेळ स्वतःला वाचवणे त्यांना जमले नाही. अखेर सोनाली गायकवाड यांनी बनावट सह्या केल्या आणि बनावट स्टॅम्प वापरून आर्थिक घोटाळा केल्याचे मान्य केले. यानंतर अधिष्ठात्यांनी चौकशी सुरू केली. नोंदी तपासल्या असता सोनाली गायकवाड यांनी एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत ६१ लाख ६५ हजारांची अफ़रातफतर केल्याचे समोर आले. यानंतर कारवाई सुरू झाली. केईएमच्या प्रशासनाने सोनाली गायकवाड यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस पुढील तपास करून कारवाई करतील अशी माहिती केईएमच्या प्रशासनाने दिली.

मुंबई ते रायगड अवघ्या 20 मिनिटांत गाठता येणार, वाचा कसा आहे देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

Sea Links to ease Mumbai roads : नरिमन पॉइंट ते विरार एका तासात, 5 सी लिंकमुळे प्रवास होणार सुपरफास्ट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी