मुंबईकरांनो ताबडतोब जागा सोडा, नाहीतर...

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 26, 2022 | 09:16 IST

residents living in landslide prone areas should relocate says BMC : मुंबई महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे तसेच जमीन खचून अथवा वेगाने आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे दुर्घटना होण्याचा धोका असल्यामुळे ‘एस’ विभागातील विक्रोळी पश्चिमेच्या अनेक नागरिक वस्त्यांना मुंबई महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे.

residents living in landslide prone areas should relocate says BMC
मुंबईकरांनो ताबडतोब जागा सोडा, नाहीतर...  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईकरांनो ताबडतोब जागा सोडा, नाहीतर...
  • ‘एस’ विभागातील विक्रोळी पश्चिमेच्या अनेक नागरिक वस्त्यांना मुंबई महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला
  • स्वखर्चाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे जीवित अथवा वित्तहानी झाल्यास यासाठी पालिका जबाबदार नसेल - मुंबई मनपा

residents living in landslide prone areas should relocate says BMC : मुंबई : मुंबई महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे तसेच जमीन खचून अथवा वेगाने आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे दुर्घटना होण्याचा धोका असल्यामुळे ‘एस’ विभागातील विक्रोळी पश्चिमेच्या अनेक नागरिक वस्त्यांना मुंबई महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. या भागांतील नागरिकांनी तातडीने स्वखर्चाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास यासाठी पालिका जबाबदार नसेल, मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.

मोठी बातमी, मुंबईकरांनो आता बाईकच्या मागे बसतानाही हेल्मेट घाला, नाही तर होईल दंड

मुंबईच्या ‘एस’ विभागातील विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभिम नगर, गौतमगर; तसेच भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पावसाळयादरम्यान जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणा-या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. या भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असल्यामुळे धोक्याचा इशारा दिलेल्या भागातील धोकादायक इमारतींना / झोपड्यांना ‘एस’ विभाग कार्यालयातर्फे सावधगिरीच्या व सावधानतेच्या सूचना (नोटीस) यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. 

धोक्याचा इशारा दिलेल्या भागांतील नागरिकांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नसल्याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त ‘एस’ विभाग यांनी कळविले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी