Maharashtra Local Bodies Election :106 नगरपंचायती, 23 जिल्हा परिषदांचा आज निकाल,दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 19, 2022 | 12:24 IST

Maharashtra Local Body election Result : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी आरक्षण (OBC reservation) स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या (Nagarpanchayat) खुल्या झालेल्या जागांवर मतदान (Voting) होत आहे. याशिवाय भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (Gondia) जिल्हा परिषदांच्या (Zilla Parishad)23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही काल मतदान पार पडलं.

Results of 106 Nagar Panchayats, 23 Zilla Parishads today
106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदांचा आज निकाल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10, तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठीदेखील मतदान झाले.
  • आज निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात

Maharashtra Nagarpanchayat Election : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी आरक्षण (OBC reservation) स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या (Nagarpanchayat) खुल्या झालेल्या जागांवर मतदान (Voting) होत आहे. याशिवाय भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (Gondia) जिल्हा परिषदांच्या (Zilla Parishad)23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही काल मतदान पार पडलं. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी काल सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरु झालं होतं. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान काल मतदान झालं. आज निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.  (Results of 106 Nagar Panchayats, 23 Zilla Parishads today)

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार काल मतदान पार पडलं. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडलं.

हेही वाचा : Nagar Panchayat Election 2022 Result Live Update: 106 नगरपंचायती, जिल्हा परिषदांचा आज निकाल, जाणून घ्या सर्व अपडेट

राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडलं. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान झालं. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तिथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी काल मतदान झाले.  भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10, तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठीदेखील मतदान झाले. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार, सरासरी 76 टक्के मतदान झालं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी