शिंदे गटातील बंडखोर आमदारांची घरवापसी, मुंबईत पोहचताच जय श्रीरामच्या घोषणा

shiv sena rebel mlas come back in mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५० बंडखोर आमदारांना घेऊन मुंबईत पोहचले. हाॅटेल ताज प्रेसिडेंटमध्ये भाजप व शिंदे गटाच्या आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे. यावेळी संपूर्ण मुंबईत पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Return of rebel MLAs from Shinde group, ordeal to elect Assembly Speaker
शिंदे गटातील बंडखोर आमदारांची घरवापसी, विधानससभा अध्यक्ष निवडीत अग्नीपरिक्षा ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन मुंबईत दाखल
  • मुंबईत कडेकोट बंदोबस्त
  • शिंदे व फडणवीस आमदारांची हाॅटेल ताज प्रेसिडेंटमध्ये संयुक्त बैठक

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेनेचे बंडखोरे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर वेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, १२ दिवसांपासून सुरत, गुवाहाटी आणि गोव्यात मुक्कामास असलेले 50 समर्थक आमदारांना घेऊन शिंदे आज मुंबईत दाखल झाले. (Return of rebel MLAs from Shinde group, ordeal to elect Assembly Speaker)

उद्यापासून विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन होणार आहे. उद्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. विधानसा अध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणीसंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी आज मुंबईतील हाॅटेल ताज प्रेसिडेंटमध्ये भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे. याबैठकीत शिंदे आणि फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. 

अधिक वाचा : Eknath Shinde Government : धक्कातंत्राच्या घातक ट्रेंडपासून सावधान, निर्णयाची योग्यता ठरवायची कशी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी राजभवनात शपथविधी पार पडला. तेव्हापासून 50 समर्थक आमदार गोव्यातील ताज कन्व्हेंन्शन सेंटर या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. या बंडखोर आमदारांशी कोणाशी संपर्क होऊ नये म्हणून, एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या आमदारांसोबत गोव्यात आहेत. शपथविधीपासूनच एकनाथ सर्वांची मोबाईल आणि व्हिडिओ काॅलद्वारे संपर्कात होते. तसेच काल काल शासकीय बैठका आटोपल्यानंतर मध्यरात्री ते गोव्यात पोहचले. त्यानंतर आज दुपारी 50 समर्थक आमदारांना घेऊन स्वत: शिंदे मुंबई पोहचले. 

अधिक वाचा : Satara Murder : सातार्‍यात अज्ञात व्यक्तीची गोळी घालून हत्या, गुन्हा दाखल

या बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपने जय्यत तयारी केली होती. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात आहेत. दरम्यान, विधानसभेचे विशेष अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी