Ketki Chitale FB Post: पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई, केतकी चितळेची हायकोर्टात धाव

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 07, 2022 | 15:06 IST

गेल्या 23 दिवसांपासून अटकेत असलेली अभिनेत्री (Actress) केतकी चितळे (Ketki Chitale) हिने आता मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात (Court) अर्ज केला आहे. केतळीवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे रद्द करण्यात यावे, अशा मागणीचा अर्ज केतकीने न्यायालयात केला आहे.

 Revenge action against me, Ketki appeal to the High Court
माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई, केतकीची हायकोर्टात धाव   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सध्या केतळी न्यायालयीन कोठडीत आहे.
  • फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर 14 मे रोजी कळवा पोलिसांनी केतकी विरोधात गुन्हा दाखल
  • केतळीवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल आहेत

मुंबई : गेल्या 23 दिवसांपासून अटकेत असलेली अभिनेत्री (Actress) केतकी चितळे (Ketki Chitale) हिने आता मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात (Court) अर्ज केला आहे. केतळीवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे रद्द करण्यात यावे, अशा मागणीचा अर्ज केतकीने न्यायालयात केला आहे. ही विनंती करताना केतकीनं प्रश्न केला की,, मी पवार नावाच्या व्यक्तीवर कविता केली होती, परंतु तक्रार कोणत्याच पवार नावाच्या व्यक्तीने केलेली, मग अटक कायदेशीर कशी, असा प्रश्न तिने केला आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सध्या केतळी न्यायालयीन कोठडीत आहे.  या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी होण्यासाठी वकील घनश्याम उपाध्याय यांनी कोर्टाला विनंती अर्ज देखील करणार आहे. "अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारींच्या आधारे दाखल करून घेण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटक कारवाईही बेकायदा आहे" असे केतकीने म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार यांच्याविषयीची आक्षेपार्ह कविता सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल कळवा पोलीस ठाण्यासह राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यांत केतकीविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर 14 मे रोजी कळवा पोलिसांनी केतकी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिला 15 जूनला अटक करण्यात आली होती. ठाणे न्यायदंडाधिकारी कोर्टाने केतकीला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर केतकी आता न्यायालयीन कोठडीत आहे.

केतकीचे काय आहे म्हणणे

केतकीचे असे म्हणणे आहे की, ज्या व्यक्तीने माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, त्याच्या नावाचा उल्लेख सदरील फेसबुकवरील कवितेत नाही. मी फेसबुकवर पोस्ट केलेली कविता ही पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यक्तीला दुखवणारी ही पोस्ट असली तरीही कोणत्याही पवार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार दिलेले नाही. मग पोलीस मला अटक कशी काय करु शकतात, असा प्रश्न केतकीने विचाराला आहे. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप देखील केतकीने केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी