लाच मागण्यात कानून के हाथ महसूल विभागापेक्षा आखुड, महसूल विभाग आहे अव्वल तर महाराष्ट्र पोलीस दुसऱ्यास्थानी

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 06, 2022 | 11:33 IST

देशभरात कोरोनामुळं व लॉकडाऊनमुळे लाचखोरी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात भ्रष्टाचार (Corruption) फोफावला आहे. या वर्षभरात लाच घेण्याची संख्या वाढली असून यात राज्याचे महसूल विभाग (revenue department), अव्वल आहे. तर पोलीस विभाग (Maharashtra Police) दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

 revenue department Corrupted  more than Police
लाच घेण्यात महसूल विभाग आहे अव्वल तर महाराष्ट्र पोलीस दुसऱ्यास्थानी   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सहा महिन्यात ३१४ प्रकरणांविरुद्ध गुन्हा दाखल
  • ३०६ प्रकरणं सापळा रचून ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण १४.३ कोटींची लाच मागण्यात आली.

मुंबई : देशभरात कोरोनामुळं व लॉकडाऊनमुळे लाचखोरी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात भ्रष्टाचार (Corruption) फोफावला आहे. या वर्षभरात लाच घेण्याची संख्या वाढली असून यात राज्याचे महसूल विभाग (revenue department), अव्वल आहे. तर पोलीस विभाग (Maharashtra Police) दुसऱ्या क्रमांकावर आहे. एसीबीने गेल्या सहा महिन्यात ३१४ प्रकरणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ३०६ प्रकरणं सापळा रचून ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण १४.३ कोटींची लाच मागण्यात आली.

मागील सहा महिन्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ३१४ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ७२ अधिकारी हे महसूल विभागातील आहे. तर, पोलीस विभागातील ६७ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर, मुंबई महापालिकाविभागातील १९ अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना एसीबीने सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. त्यात २० जिल्हा परिषद, २९ पंचायत समिती, ६ वन विभागाचे अधिकारी, सात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि १३ शिक्षण अधिकारी आहेत.

महिन्याभराच्या कमाईपेक्षा अधिक लाच

मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबर सुरेश बामने आणि त्याची पत्नी यांच्यावर १२. ७ कोटी लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच मागितलेली रक्कम ही त्यांच्या पगारापेक्षा १,५००% अधिक आहे. तर, दुसरीकडे मुंबई महापालिकेतील नितीन पाटणकर यांनीही ३८.३ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही लाच त्यांच्या महिन्याच्या कमाईपेक्षा ४५% अधिक होती.गेल्या महिन्यात एसीबीने भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला होता. १ जानेवारी २००६ ते ३१ ऑगस्ट २०१५ दरम्यान मेहतांनी उत्पन्नापेक्षा ८.२५ कोटी रुपयांची अधिक संपत्ती गोळा केल्याचं तपासातून समोर आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी