revenue minister balasaheb thorat covid19 positive : मुंबईः महाराष्ट्राचे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोना झाला आहे. प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड यांच्या पाठोपाठ थोरातांनाही कोरोना झाला आहे. स्वतः बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करुन कोरोना झाल्याची माहिती दिली.
'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. मास्क वापरावा, काळजी घ्यावी'; असे ट्वीट बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोना झाला आहे. स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. मागील आठ-दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी; असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील विनामास्क आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित होते. या सोहळ्यात राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेते पण उपस्थित होते. तसेच राज्यातील जे मंत्री आणि आमदार कोरोनाबाधीत झाले आहेत ते सर्व विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित होते. यामुळे राज्यातील आणखी किती उच्च पदस्थांना कोरोना झाला आहे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.