मुंबई : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली असून 2 हजार 960 पेक्षा अधिक सदस्य रिपाइंचे निवडून आले आहेत. राज्यात भाजप आणि आरपीआयला ग्राम पंचायत निवडणुकीत बहुमत लाभले असून राज्यात भाजपवरच जनमानसांचा विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी आज केला.
निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी निवडणुकीत झालेले वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.
राज्यात झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अंदाजे 3 हजार सदस्य निवडुन आले आहेत. तसेच राज्यात 60 ग्राम पंचायती रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात जिंकण्यात आल्या अहेत.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) January 19, 2021
राज्यात 12 हजार 711 ग्राम पंचायती च्या झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा अंदाजे 60 ग्राम पंचायतीवर निळा झेंडा फडकला असून संपूर्ण राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीत 3 हजार सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले आहेत. अशी माहिती रिपाइं चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर निवडणुका लढविल्या असून येथील अक्कलकोट तालुक्यातील गावात रिपाइं ने भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आशा सर्व पक्षांना दणका देत स्वबळावर सर्व उमेदवार निवडून आणून ग्राम पंचायतीवर निळा झेंडा फडकविला असल्याची माहिती राजभाऊ सरवदे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात रिपब्लिकन पक्षाची जनतेशी नाळ घट्ट आहे. अनेक ठिकाणी स्वबळावर तर राज्यभरात बहुतांश ठिकाणी भाजप शी युती करून रिपाइं ने ग्राम पंचायत निवडणूक लढविली आहे. त्यात रिपाइं चे 3 हजार हुन अधिक निवडून आल्याचा दावा ना रामदास आठवले यांनी केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.