टॅक्सी आणि App बेस्ड कॅब सेवेविरोधात तक्रारींसाठी RTO Helpline

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 14, 2022 | 17:02 IST

RTO Helpline for Complaints against Taxi and App Based Cab Services : काळी पिवळी टॅक्सी आणि अॅप बेस्ड कॅब सेवेविरोधात तक्रारींसाठी मुंबईच्या ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हेल्पलाईन सुरू केली आहे.

RTO Helpline for Complaints against Taxi and App Based Cab Services
टॅक्सी आणि App बेस्ड कॅब सेवेविरोधात तक्रारींसाठी RTO Helpline  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • टॅक्सी आणि App बेस्ड कॅब सेवेविरोधात तक्रारींसाठी RTO Helpline
  • काळी पिवळी टॅक्सी आणि अॅप बेस्ड कॅब सेवेविरोधात तक्रारींसाठी हेल्पलाईन
  • हेल्पलाईनमुळे काळी पिवळी टॅक्सी आणि अॅप बेस्ड कॅब सेवा यांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल

मुंबई : काळी पिवळी टॅक्सी आणि अॅप बेस्ड कॅब सेवेविरोधात तक्रारींसाठी मुंबईच्या ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हेल्पलाईन सुरू केली आहे. तक्रारदार 9076201010 या नंबरवर कॉल करून अथवा mh01taxicomplaint@gmail.com या ई मेल वर मेल करून तक्रार दाखल करू शकतील. (  RTO Helpline for Complaints against Taxi and App Based Cab Services )

प्रादेशिक परिवहन विभाग तक्रारीची दखल घेऊन चौकशी करेल. तक्रारीत तथ्य आढळले, चालक दोषी आढळला तर नियमानुसार कारवाई केली जाईल. दोषी चालकावर वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) रद्द करणे (कॅन्सल) अथवा निलंबित करणे (सस्पेंड), दंड (फाइन) अशा स्वरुपाची कारवाई केली जाईल.

रस्त्यावर अपघात झाल्यास टॅक्सी चालकाने अथवा अॅप बेस्ड कॅब सेवा देणाऱ्या चालकाने घटनास्थळी जाऊन मदत करणे अपेक्षित आहे. या करिता चालकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने जीवनदूत सत्कार योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार अपघातस्थळी जाऊन मदत करणाऱ्या निवडक गुणी टॅक्सी चालकांचा अथवा अॅप बेस्ड कॅब सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार केला जाईल. 

अनेकदा जास्त भाडे घेणे, जवळच्या ठिकाणी जाण्यास नकार देणे, सुटे पैसे नाही असे कारण देत वाद घालणे अशा स्वरुपाच्या अनुभवांना प्रवासी सामोरे जातात. टॅक्सी चालक आणि अॅप बेस्ड कॅब सेवा देणाऱ्या चालकांच्या संदर्भात अशा स्वरुपाच्या तक्रारींची दखल घेऊन नियमानुसार कारवाई केली जाईल; अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. 

टॅक्सी चालक अथवा अॅप बेस्ड कॅब सेवा देणारा चालक यांच्याकडून प्रवाशांना त्रास होऊ नये आणि त्रास झाला तर तातडीन तो त्रास दूर करणे शक्य व्हावे या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनमुळे काळी पिवळी टॅक्सी आणि अॅप बेस्ड कॅब सेवा यांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. प्रवाशांना सुरक्षित आणि सुखदायी वातावरणात प्रवास करण्याचा आनंद घेता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी