Precautionary Dosage : 'यांना' मिळेल कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशनरी डोस!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 08, 2022 | 03:30 IST

Rules For Precautionary Dosage of Corona Preventive Vaccine : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशनरी डोस अर्थात खबरदारीचा उपाय म्हणून द्यायचा डोस निवडक नागरिकांनाच दिला जाईल. यासाठीचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. या नियमांनुसार सोमवार १० जानेवारी २०२२ पासून प्रिकॉशनरी डोस देण्यास सुरुवात होईल.

Rules For Precautionary Dosage of Corona Preventive Vaccine
'यांना' मिळेल कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशनरी डोस!  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'यांना' मिळेल कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशनरी डोस!
  • प्रिकॉशनरी डोससाठीचे नियम
  • सोमवार १० जानेवारी २०२२ पासून मिळेल प्रिकॉशनरी डोस

Rules For Precautionary Dosage of Corona Preventive Vaccine : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशनरी डोस अर्थात खबरदारीचा उपाय म्हणून द्यायचा डोस निवडक नागरिकांनाच दिला जाईल. यासाठीचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. या नियमांनुसार सोमवार १० जानेवारी २०२२ पासून प्रिकॉशनरी डोस देण्यास सुरुवात होईल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांतर्गत मुंबई महापालिकेने एक प्रसिद्धीपत्रक काढून कोणाला लसचा प्रिकॉशनरी डोस मिळेल हे जाहीर केले आहे.

Punjab Corona : एअर इंडियाच्या विमानात झाला कोरोनाचा 'स्फोट', इटलीहून आलेल्या विमानातून १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

  1. हेल्थ वर्कर्स (आरोग्य क्षेत्राशी संबंधित डॉक्टर आणि इतर अधिकारी-कर्मचारी), फ्रंटलाइन वर्कर्स (कोरोना संकटात आघाडीवर काम करणारे) यांना लसचा तिसरा डोस दिला जाईल तसेच सरकारने जाहीर केलेल्या आजारांच्या यादीतील किमान एक आजार असलेल्या साठ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशनरी डोस अर्थात खबरदारीचा उपाय म्हणून द्यायचा डोस दिला जाईल.
  2. दुसरा डोस घेऊन किमान ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेली आणि पहिल्या नियमानुसार तिसरा डोस/प्रिकॉशनरी डोससाठी पात्र असलेली व्यक्तीच तिसरा डोस/प्रिकॉशनरी डोस घेऊ शकेल.
  3. साठ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रिकॉशनरी डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रिकॉशनरी डोस घेता येईल.
  4. सरकारी लसीकरण केंद्रावर तिसरा डोस/प्रिकॉशनरी डोस विनामूल्य दिला जाईल. 
  5. खासगी लसीकरण केंद्रावर सरकारमान्य दराने तिसरा डोस/प्रिकॉशनरी डोस घेता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी