Maharashtra Winter Session : विधानसभेत सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; नितेश राणेंच्या निलंबनाच्या मागणीवरुन गोंधळ

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 27, 2021 | 14:52 IST

Winter sesesion Update आज विधानसभेत (Assembly) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. राज्याचे पर्यावण मंत्री  (Environment Minister) आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray)  यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांचं निलंबन (Suspension) करावं, अशी मागणी करत शिवसेना (Shiv Sena) सदस्य चांगलेच आक्रमक झाले.

Maharashtra Winter Session
विधानसभेत सत्ताधारी-विरोधक आमने-सामने  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मोदींपेक्षा जरी आदित्य ठाकरे लहान असले तरी त्यांच्यावर अशाप्रकारे टीका करणं योग्य नाही.- आमदार सुहास कांदे
  • सभागृहात नितेश राणे हाय हायच्या जोरदार घोषणा

Maharashtra Winter sesesion Update :  मुुंबई :  आज विधानसभेत (Assembly) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. राज्याचे पर्यावण मंत्री  (Environment Minister) आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray)  यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांचं निलंबन (Suspension) करावं, अशी मागणी करत शिवसेना (Shiv Sena) सदस्य चांगलेच आक्रमक झाले. त्यांच्या निलंबनाच्या मागणीनंतर विरोधक (Opponent) आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळाले.   

तात्काळ माफी मागा किंवा निलंबन करा 

सभागृहात हा विषय आमदार सुहास कांदे यांनी मांडला. त्यांनी सांगितलं की, आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यावर नितेश राणे यांनी पुन्हा आपण असं बोलणार असं म्हटलं आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मोदींपेक्षा जरी आदित्य ठाकरे लहान असले तरी त्यांच्यावर अशाप्रकारे टीका करणं योग्य नाही. जर कोणी वाईट बोललं तर खपवून घेतलं जाणार नाही, असं कांदे म्हणाले. कांदे म्हणाले की, मोदींबाबत जेव्हा भास्कर जाधव यांनी कृती केली तर त्यांनी त्याबाबत माफी मागितली. आता नितेश राणे यांनी जे वक्तव्य केले आहे. त्याबाबत तत्काळ निलंबन करा अथवा तात्काळ माफी मागायला हवी. नितेश राणे यांच्याकडून आपण वारंवार असं बोललं जातं आहे की मी असं पुन्हा बोलणार. अध्यक्षांनी समज देऊन देखील जर ते चूक करत असतील तर त्यांचं निलंबन व्हायला हवं. 

कायम स्वरूपी निलंबित करा

या विषयावर बोलातना भास्कर जाधव म्हणाले की, मी तीन दिवसांपूर्वी काही वक्तव्य केलं त्यावेळी मी माफी मागितली. आता दोन दिवसांपूर्वी जी नितेश राणे यांनी टिप्पणी केली त्यांनी जो आवाज काढला तो मुद्दा सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी तत्कालीन तालिका अध्यक्ष यांनी विषय संपवला होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होत की हा विषय हा लाईटली घेऊ नका. भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी केली.यानंतर सर्व सदस्य अध्यक्षांसमोर येत घोषणाबाजी केली. तसेच नितेश राणे हाय हायच्या जोरदार घोषणा दिल्या. यामुळे सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं की, “या सभागृहात अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याकडे पहायचंच नाही असा नवा पायंडा सुरु झाला आहे का? ठरवून निलंबन केलं जात अल्याचं दिसत आहे.  आम्हाला हरकत नाही, आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहोत, रडणारे नाही. नितेश राणे यांच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार बदलत असतात एकदा तुम्ही जर पायंडा पाडला तर पुढील काळात विरोधक उरणार नाहीत, असं फडणवीस म्हणाले. 

कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही सदस्याने असं वागू नये सांगितलं आहे. पण आता भास्कर जाधव तुम्ही विषय काढला अस म्हणत फडणवीसांनी एक जुनी गोष्ट आठवून दिली. याच सभागृहात भुजबळ साहेब तिकडे बसायचे आणि भास्कर जाधवांसहित आम्ही सगळे इकडे बसायचो तेव्हा हुप हुप करणाऱ्यांमध्ये भास्कर जाधवही होते. हे या सभागृहाने पाहिलं आहे,” अशी आठवण फडणवीसांनी यावेळी करुन दिली.   भास्कर जाधव भुजबळांना बघून हुप हुप करायचे. याचं देखील समर्थन होऊ शकत नाही. जर हे ठरवून आला असाल की आमदाराला निलंबित करायचं आहे हे लोकशाहीला धरून नाही, असं फडणवीस म्हणाले.  मी स्वतः भूमिका घेतली होती की नितेश राणे यांनी चुकीचं केलं आहे. आधी तुम्ही 12 निलंबित केले आता आणखी एक निलंबित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे.  
भास्कर जाधवांच्या त्या वागण्याचंही समर्थन नाही. पण या सभागृबाहेर जे काही घडलं त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण जर हे त्या गोष्टीचा फायदा घेत निलंबन करण्याच्या हेतूने आले असतील तर लोकशाहीत हे योग्य नाही. आमचे १२ सदस्य निलंबित झाले असून सुप्रीम कोर्टात गेल्याचा आनंद नाही. आमच्यावर ही वेळ आणली जात आहे. इथे कायदा, संविधान मानलं जात नाही. एक-एक वर्ष निलंबन करणं योग्य नाही,” अशा शब्दांत फडणवीसांनी संताप व्यक्त केला.

“भास्कर जाधव यांचं म्हणणे आहे की, नितेश राणे बाहेर बोलले. ते चुकीचे बोलले ही मी जाहीर भूमिका घेतली आहे. माझा सदस्य असला तरी ही भूमिका घेण्याची हिंमत आमच्यात आहे. पण अध्यक्ष महोदय तुमचा डाव येथे लक्षात येत आहे. तुम्हाला आणखी एक सदस्य निलंबित करायचा आहे,” असा आरोप फडणवीसांनी यावेळी केली. आमच्यावर कितीही निलंबनाची कारवाई झाली तरी आम्ही लढू असा इशारा यावेळी त्यांनी दिला. नवाब मलिक म्हणाले की, सभागृहात पोलीस सुद्धा आत येऊ शकत नाही. त्याचा निर्णय अध्यक्ष घेत असतात. एखादा सदस्य चुकीचं वागत असेल तर त्यावर कारवाई व्हायला हवी. भास्कर जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. सदरचे सदस्य उपस्थित नाहीत मात्र त्यांचा खुलासा मागवायला हवा, असं मलिक म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी