रशियन महिलेवर बलात्कार करुन वारंवार गर्भपात, मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल  

मुंबई
रोहित गोळे
Updated Oct 11, 2019 | 13:32 IST

Russian Woman Raped: एका रशियन महिलेवर सलग १२ वर्ष बलात्कार करुन तिचा वारंवार गर्भपात केल्याप्रकरणी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

russian woman raped and many times abortion booked against mumbai police officer
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • रशियन महिलेवर १२ वर्ष बलात्कार, पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
  • पोलीस अधिकाऱ्याने महिलेचा वारंवार बलात्कार केल्याचाही आरोप
  • पोलीस अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुंबई पोलीस दलात खळबळ

मुंबई: मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने रशियन महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात बरीच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनेच पोलिसात तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत तिने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात  दरम्यान, महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलीस अधिकारी हा तिच्यावर मागील १२ वर्षांपासून सतत बलात्कार करत होता. त्यामुळे ती अनेकदा गर्भवती देखील राहिली होती. पण प्रत्येक वेळेस पोलीस अधिकाऱ्याने तिचा गर्भपात केला होता. गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचं नाव अनिल जाधव असं असल्याचं समजतं आहे. 

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, साधारण २००३ साली अनिल जाधव या पोलीस अधिकाऱ्याशी तिची भेट झाली होती. तिला व्हिसा वाढवून हवा असल्याने तिची त्याचनिमित्ताने अनिल जाधवशी भेट झाली होती. यावेळी अनिलने देखील तिला तिचं काम करुन देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर एकदा त्याने गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. गेले अनेक वर्ष हा पोलीस अधिकारी तिच्यावर बलात्कार करत असल्याचं तिने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. तसंच यामुळे अनेकदा त्याने तिचा गर्भपात केल्याचंही तिने म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीने दिलं आहे. 

दरम्यान, तरुणीने पोलीस अधिकाऱ्याविरोधात फक्त बलात्काराचाच नाही तर खुनाचा देखील गंभीर आरोप केला आहे. या पोलीस अधिकाऱ्याने फक्त बलात्काराच केला नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय त्याने एका तरुणीचा आणि तिच्या भावाची आपल्यासमोर हत्या केल्याचा अतिशय गंभीर आरोपही केला आहे. या दोघांचीही त्याने पुण्यात हत्या केल्याचा आरोप रशियन महिलेने केला आहे. 

या संपूर्ण प्रकारामुळे मुंबई पोलीस देखील हडबडून गेलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ चौकशी देखील सुरु केली असल्याचं समजतं आहे. दरम्यान, पीडित तरुणीने आपल्या वकिलांमार्फत तक्रार पोलिसात दाखल केली आहे. तसंच संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित तरुणीने यावेळी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी