निकालानंतर काय आहे आजच्या 'सामना'मध्ये, कोणाचं केलं कौतुक, कोणाला लगावला टोला

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 25, 2019 | 09:47 IST

निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात नेमकं काय वाचायला मिळणार यांची उत्सुकता लागली होती. सामना वृत्तपत्रातून कोणाचं कौतुक करणार आणि कोणावर टीका करणार याची उस्तुकता होती.

Samana Front page
निवडणुकीच्या निकालानंतर काय आहे आजच्या 'सामना'मध्ये, कोणाचं केलं कौतुक, कोणाला लगावला टोला   |  फोटो सौजन्य: Times Now

गुरूवारी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. . निकाल जाहीर झाल्यानंतर आता युतीची चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. पण आता खरी लढत सुरू झाली आहे ती मुख्यमंत्रीपदासाठी.  आता मुख्यमंत्रीपदासाठी युतीत रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसतंय.  त्यातच एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता होती की, निकालानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात नेमकं काय वाचायला मिळणार. सामना वृत्तपत्रातून कोणाचं कौतुक करणार आणि कोणावर टीका करणार याची उस्तुकता होती. निकालानंतर शुक्रवारच्या म्हणजेच आजच्या सामनामध्ये सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे असं म्हटलं आहे. 

वृत्तपत्राच्या लीडला सर्वांत वरच्या बाजूला सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे असं म्हटलं आहे. सामनातील हे वाक्य थोडं फार गोंधळात टाकणारं आहे. यावरून शिवसेनेला नेमकं काय म्हणायचे आहे, हे अद्यापतरी अस्पष्ट आहे. त्यानंतर मेन लीडवर महाराष्ट्रात महाजनादेश युतीलाच असं लिहून महा या शब्दावर फुली मारली आहे. यावरूनच स्पष्ट होतं की, शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काढलेल्या महाजनादेश यात्रेवर टीका केली आहे. त्याच्याच खालोखाल शिवसेनेनं शरद पवारांचं कौतुक केलं आहे. शरद पवारांनी पॉवर दाखवली... काँग्रेसलाही लाभ असं नमून करण्यात आलं आहे. यावरून शिवसेनेनं सामनामध्ये भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर नाराजी दाखवत राष्ट्रवादी- काँग्रेससह शरद पवारांचं कौतुक केलं आहे. 

भाजपनं सर्वाधिक १०२ जागा जिंकल्या असल्या तरी सत्तेच्या चाव्या ५७ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेच्याच हाती आल्या आहेत, असं सांगायला ही शिवसेना विसरली नाही आहे.  त्यासोबतच गेल्या निवडणुकीत सुपडा साफ झालेल्या विरोधकांना शरद पवार यांच्या अथक परिश्रमानं पॉवर दिली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसनं ५४ जागा जिंकल्या. पवारांच्या पॉवरमुळे काँग्रेसलाही संजीवनी मिळाली. काँग्रेसला ५४ जागा मिळवता आल्या, असंही सामनात नमूद केलं आहे.

यासोबतच वरळी मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विजयाचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरे यांचा विक्रमी विजय असं म्हटलं आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे लागलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी