Sachin Waze in police custody सचिन वाझे आता मुंबई पोलिसांच्या कोठडीत

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 01, 2021 | 18:58 IST

Sachin Waze in Mumbai Police Crime Branch Custody Till 6 November 2021 मुंबई पोलीस दलातून निलंबित केलेल्या सचिन वाझे याला क्राइम ब्रँचने ताब्यात घेतले आणि कोर्टात हजर केले. कोर्टाने वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.

Sachin Waze in Mumbai Police Crime Branch Custody Till 6 November 2021
सचिन वाझे ६ नोव्हेंबरपर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • सचिन वाझे आता मुंबई पोलिसांच्या कोठडीत
  • सचिन वाझे ६ नोव्हेंबरपर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत
  • खंडणी वसुली प्रकरण

Sachin Waze in Mumbai Police Crime Branch Custody Till 6 November 2021 । मुंबईः मुंबई पोलीस दलातून निलंबित केलेल्या सचिन वाझे याला क्राइम ब्रँचने ताब्यात घेतले आणि कोर्टात हजर केले. कोर्टाने वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. यामुळे सचिन वाझे आता ६ नोव्हेंबरपर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत असेल. 

एनआयएने चौकशी केल्यानंतर वाझेची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. यानंतर सचिन वाझेला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने एका खंडणी वसुली प्रकरणात ताबा मागितल्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझेला तळोजा जेलमधून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. क्राइम ब्रँचने खंडणी वसुली प्रकरणात वाझेला कोर्टात हजर केले. कोर्टाने वाझेला पोलीस कोठडी दिली. यामुळे सचिन वाझे ६ नोव्हेंबरपर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी