सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास उत्सुक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 27, 2022 | 07:48 IST

sachin waze ready to become an approver : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात साक्ष देण्याची तयारी सचिन वाझे याने दाखविली आहे. माफीचा साक्षीदार होण्यास सचिन वाझे तयार आहे.

sachin waze ready to become an approver
सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास उत्सुक 
थोडं पण कामाचं
  • सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास उत्सुक
  • कायद्यानुसार वाझेला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता द्यायची की नाही याचा निर्णय विशेष सीबीआय न्यायालयात होणार
  • सीबीआयचे विशेष न्यायालय ३० मे रोजी सुनावणी घेणार

sachin waze ready to become an approver : मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात साक्ष देण्याची तयारी सचिन वाझे याने दाखविली आहे. माफीचा साक्षीदार होण्यास सचिन वाझे तयार आहे. कायद्यानुसार वाझेला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता द्यायची की नाही याचा निर्णय विशेष सीबीआय न्यायालयात होणार आहे. 

सीबीआयचे विशेष न्यायालय ३० मे रोजी एक सुनावणी घेणार आहे. या सुनावणीत सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता द्यायची की नाही याचा निर्णय होणार आहे. 

सचिन वाझे याच्यावर मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफर आणि खंडणी वसुली करणे तसेच मनसुख हिरेन याच्या हत्येच्या प्रकरणात हात असल्याचा आरोप आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचाही आरोप वाझेवर आहे. या प्रकरणात केंद्रीय यंत्रणांनी सखोल चौकशी सुरू केली. सखोल चौकशीतूनच पुढे अनिल देशमुख अडचणीत सापडले. आता वाझेला माफीचा साक्षीदार करून घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली तर अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सीबीआयकडे केला अर्ज

सचिन वाझेने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सीबीआयकडे अर्ज केला. हा अर्ज सीबीआयने निवडक अटी घालून मान्य केला. पण कायद्यानुसार एखाद्या आरोपीला माफीचा साक्षीदार व्हायचे असल्यास न्यायालयाकडून तपास यंत्रणेला परवानगी घ्यावी लागते. याच कारणामुळे १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार करुन घेण्यासाठी सीबीआयने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाची सुनावणी ३० मे २०२२ रोजी होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी