शिंदे गटाची मनसेशी नाळ घट्ट होण्याची शक्यता; राज ठाकरेंच्या भेटीला सरवणकर, चर्चेला उधाण

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 06, 2022 | 14:54 IST

राजकीय सत्तासंघर्षानंतर अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कामाला लागले आहे. तरीही शिंदे गटाकडून भेटीगाठी सुरूच आहेत. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (mla sada sarvankar) यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे दादर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सदा सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत.

sada sarvankar meet to MNS chief Raj Thackarey
सरवणकरांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं सेनेच्या गोटात खळबळ  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : राजकीय सत्तासंघर्षानंतर अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कामाला लागले आहे. तरीही शिंदे गटाकडून भेटीगाठी सुरूच आहेत. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (mla sada sarvankar) यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे दादर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सदा सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत.

सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्व शिंदे गटातील आमदार हे आपआपल्या मतदारसंघात पोहोचले आहे. आज सकाळी माहीम मतदार संघाचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी जाऊन भेट घेतली. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली होती. आता राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे परत एकदा खळबळ उडाली आहे. याचं कारण म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गटाने शिवसेनात उठाव करत नवीन युती तयार करत भाजपसोबत सरकार आणलं. त्यात राज ठाकरे हे हिंदुचे जननायक असल्याचं उल्लेख सरवणकर यांनी केलेल्यानं शिंदे गट मनसेशी आपली हिंदुत्वाची नाळ घट्ट करण्याची शक्यता आहे.  

दरम्यान भेटीचं कारण विचारल्यानंतर सदा सरवणकर म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीच्यावेळी सरवणकर यांची मुलगी आणि माजी नगरसेवक असलेला मुलगा समाधान सरवणकर ही उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सदा सरवणकर म्हणाले की, 'राज्यात सेना-भाजप सरकार स्थापन झाले आहे. राज ठाकरे हिंदु पुरस्कर्ते आहेत.  राज ठाकरे हे हिंदु जननायक आहेत. माझे शेजारी सुद्धा आहेत. त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांनी मला वेळ दिला मी आभारी आहे', अशी प्रतिक्रिया दिली.

विशेष म्हणजे,शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. यावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारला मत दिलं होतं. एवढंच नाहीतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तोंडभरून कौतुकही केलं होतं. बंड केल्यानंतर शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला होता. दोन-तृतियांश आमदार नसते तर शिंदे गटाच्या आमदारांना निलंबनाला सामोरे जावे लागले असते. त्यावेळी शिंदे गटातील आमदारांना भाजप किंवा बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेत सामील होण्याचा पर्याय होता. त्यावेळी मनसेचाही पर्यायावर विचार करण्यात येत होता. 

संजय राऊतांबद्दल सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

दरम्यान, शिंदे गटात सामील झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांनी थेट मनोहर जोशी यांचे घर जाळण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप सरवणकर यांनी केला होता. 'मी शिवसेनेत मागच्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे. मातोश्री ज्यावेळी अडचणीत येते त्यावेळी असेल त्या ठिकाणाहून आम्ही शिवसैनिक घेऊन हजर राहायचो. ज्या संजय राऊत सामना कार्यालयात बसतात ते कार्यालय आम्ही बांधले आहे. त्या कार्यालयाला पाणी पुरवण्याचे काम माझ्यासह अन्य शिवसैनिकांनी केले आहे. या संजय राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी आम्हाला आदेश दिल्याचाही त्यांनी थेट आरोप करत गौप्यस्फोट केला होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी