पवारसाहेब... हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या, माजी मंत्र्यांचे पत्र 

Sadabhau khot letter to Sharad pawar । महाराष्ट्रातील पिचलेल्या शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी राज्यात हर्बल तंबाखूच्या शेतीला परवानगी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी खोचक मागणी करणारे पत्र माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लिहिले आहे.

Sadabhau khot write letter to Shara pawar for getting permeation to harbal tobaccos
शरद पवारांना पाठवले सदाभाऊ खोतांनी पत्र   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सदाभाऊ खोतांचे पवारांना खोचक पत्र
  • नवाब मलिक यांच्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचे सांगण्यात आले.
  • महाराष्ट्रातील पिचलेल्या शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी राज्यात हर्बल तंबाखूच्या शेतीला परवानगी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत

Sadabhau khot letter to Sharad pawar । पुणे : महाराष्ट्रातील पिचलेल्या शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी राज्यात हर्बल तंबाखूच्या शेतीला परवानगी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी खोचक मागणी करणारे पत्र माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लिहिले आहे. (Sadabhau khot write letter to Shara pawar for getting permeation to harbal tobaccos)

मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना अमंली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) काही महिन्यांपूर्वी अटक केली होती.तीन आठवड्यांपूर्वी शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला यालाही अटक करण्यात आली आहे.


पाहा काय लिहिले आहे पत्रात.... 

मा.खा.शरद पवार साहेब
यांना सप्रेम नमस्कार,

विषय: हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळणेबाबत.....

माननीय महोदय, 

         आपल्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार काम करीत आहे.कोरोना काळात कसाबसा टिकून राहिलेला शेतकरी अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि महापूर अशा अस्मानी संकटात सापडून मरणप्राय वेदना भोगत आहे.आपल्या सारखे शेतीतील जाणते गुरु असूनही महाविकास आघाडी सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याने अनेक शेतकरी गळफास लावून आत्महत्या करत आहेत.शेती अक्षरशः परवडेनाशी झाली आहे.

            सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजा सारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे.गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती (हर्बल) आहे.म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील श्री अनिल बाबाजी पाटील या शेतकऱ्यांने आपल्या शेतात या मौल्यवान हर्बलची (वनस्पतीची) लागण करण्याची मागणी केली आहे.राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकऱ्यांना या मौल्यवान हर्बलची (वनस्पती) शेती करायची आहे.पण राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते.जी सहजासहजी मिळत नाही.पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे.नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखू तून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत.तरी आपणास नम्र विनंती आहे की या हर्बल तंबाखूच्या लागवडी साठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी. जेणेकरुन महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल. 


आपला, 


सदाभाऊ खोत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी