राऊतांनी मागितला पंखा, ईडीने दिला एसी; वाचा कोर्टातील युक्तिवादाची कहाणी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 04, 2022 | 14:39 IST

Sanjay Raut Case : कोर्टाने संजय राऊत यांना ८ ऑगस्ट २०२२ पर्यंत ईडी कोठडी दिली.

Sajay Raut asked for fan ED gave AC Read story of court argument in marathi
राऊतांनी मागितला पंखा, ईडीने दिला एसी; वाचा कोर्टातील युक्तिवादाची कहाणी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राऊतांनी मागितला पंखा, ईडीने दिला एसी; वाचा कोर्टातील युक्तिवादाची कहाणी
  • संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले
  • संजय राऊत यांना ८ ऑगस्ट २०२२ पर्यंत ईडी कोठडी

मुंबई : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना आज (गुरुवार ४ ऑगस्ट २०२२) मुंबईत पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी राऊत यांनी ईडी कोठडीत हवा खेळती नसलेल्या (व्हेंटिलेशन नसलेल्या) खोलीत ठेवल्याची तक्रार कोर्टात केली. या प्रकरणी कोर्टाने ईडीच्या अधिकाऱ्यांना प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना ईडीने राऊत यांना एसी असलेल्या खोलीत ठेवल्याची माहिती दिली. यानंतर हवा खेळती राहील अशी व्यवस्था असलेल्या खोलीत राऊत यांना ठेवावे, असे कोर्टाकडून सांगण्यात आले. 

ईडीच्या कोठडीची मुदत संपत असल्यामुळे संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी तपासात बरीच नवी माहिती हाती आल्यामुळे राऊत यांची चौकशी करण्यासाठी ईडी कोठडीची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढवावी अशी मागणी ईडी अधिकाऱ्यांनी केली. संजय राऊत यांच्या वकिलाने ईडीच्या मागणीला विरोध केला. पण ईडीने तपासाकरिता आणखी अवधी आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. 

प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना पैसे मिळाले. या पैशांतून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये रोखीतून व्यवहार करून जमीन खरेदी केली. या प्रकरणांमध्ये तपास आवश्यक आहे. हा तपास करण्यासाठी वेळ हवा असल्याचे ईडीने कोर्टात सांगितले. 

संजय राऊत यांचे संशयास्पद व्यवहार

संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना एक कोटी सहा लाख रुपये प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून मिळाले होते. त्यातून त्यांनी अलिबागमधील तसेच इतर काही मालमत्ता खरेदी केल्याचा दावा ईडीमार्फत कोर्टात केला गेला. या प्रकरणी तपास आवश्यक असल्याचे ईडीने सांगितले.

संजय राऊत यांना ८ ऑगस्ट २०२२ पर्यंत ईडी कोठडी

यानंतर स्वप्ना पाटकर यांच्यावतीने वकिलाने कोर्टात युक्तिवाद केला. संजय राऊत यांच्याकडून स्वप्ना पाटकर यांना कशा प्रकारे त्रास देण्यात आला आणि देण्यात येत आहे याची माहिती पाटकर यांच्या वकिलाने कोर्टाला दिली. सुनावणी अंती कोर्टाने संजय राऊत यांना ८ ऑगस्ट २०२२ पर्यंत ईडी कोठडी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी