उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेलेले संभाजी भिडे रिकाम्या हाती परतले

मुंबई
Updated Nov 07, 2019 | 23:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sambhaji Bhide: शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सुरु असलेल्या राजकीय सत्ता संघर्ष आता टोकाला पोहोचला असल्याचं दिसत आहे. 

sambhaji bhide uddhav thackeray metting matoshree shiv sena bjp maharashtra government formation news marathi
संभाजी भिडे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • संभाजी भिडे रिकाम्या हाती माघारी परतले
  • मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट झाली नाही
  • उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी संभाजी भिडे गेले होते मातोश्रीवर

मुंबई: सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाच्या पेचात उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी संभाजी भिडे मातोश्रीवर पोहोचले. मात्र, संभाजी भिडे हे रिकाम्या हाती परतल्याचं वृत्त समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता संघर्ष थांबवण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे गुरुवारी रात्री मातोश्रीवर पोहोचले. पण संभाजी भिडे यांना उद्धव ठाकरेंची भेट घेता आलीच नाही.

उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांना रिकाम्या हाती परतावं लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेसाठी मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठीच संभाजी भिडे यांनी पुढाकार घेत मातोश्री गाठल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक म्हणजेच १०५ जागांवर विजय मिळवला तर शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला. जनादेश हा महायुतीच्या बाजुने असला तरी दोन्ही मुख्यमंत्रिपदावरुन संघर्ष सुरु आहे. शिवेसना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर ठाम आहे तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाहीये. 

राजकीय परिस्थिती पाहता आपल्या पक्षातील आमदारांना प्रलोभनं दाखवून दाखवून फुटले जाऊ नयेत यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आणदारांना मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये त्यांच्या सर्वांची राहण्याची सोय केली आहे. तर भाजपने देखील आपल्या सर्व १०५ आमदारांना मुंबईत बोलावले आहे. सोबतच ज्या अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे त्यांनाही भाजपने मुंबईत बोलावले आहेत.

८ नोव्हेंबर रोजी १३व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे शुक्रवारी देवेंद्र फडणवीस आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास विद्यमान मंत्रिमंडळ बरखास्त होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी