Sambhaji Raje Bhosale : मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वीच आपण राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. अशातच जुलैमध्ये राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक होणार असून, राज्यसभेच्या या जागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस , आणि शिवसेनेच्या प्रयेकी १ जागा असून, भाजपच्या २ जागा निवडून येण्याइतके संख्याबळ आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असून, यासाठी त्यांनी आपल्याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील केलं आहे. दरम्यान, आता संभाजीराजे छत्रपती यांनी विधानसभेच्या सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी हे पत्र आपल्या अधिकृत ट्वीटरवरती देखील शेअर केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पत्रात मला आपल्या सर्वांच्या मदतीची अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजांच्या आव्हानाला प्रतिसाद दर्शवला असून, परंतु राज्यसभेसाठी शिवसेना आपले दोन उमेदवार देणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संकेत दिल्याने संभाजीराजे छत्रपती यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
अधिक वाचा : ताटात असू द्या या 6 गोष्टी, आपोआप घटवा कोलेस्ट्रॉल!
आपणास कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपाला दोन जागांकरिता विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवर ती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व विधानसभा आमदारांना केलं आहे.
अधिक वाचा ; ट्विटरच्या विरोधात सीबीआय डायरेक्टर पोहचले कोर्टात
राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा कार्यकाळ नुकताच संपला. कार्यकाळ संपल्यानंतर १२ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन भावी योजना जाहीर करणार असल्याचे संभाजी राजे म्हणाले होते. घोषणेनुसार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्यसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले.
अधिक वाचा ; राशीभविष्य बुधवार १८ मे २०२२, कसा जाईल आजचा दिवस
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.