समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीचा दिलासा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 13, 2022 | 12:25 IST

जात पडताळणी समितीने केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. समितीने नवाब मलिक यांच्यासह चौघांचे म्हणणे फेटाळले आहे.

sameer wankhede belong from scheduled caste community says mumbai caste scrutiny committee
समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीचा दिलासा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीचा दिलासा
  • समीर वानखेडे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा ठोस पुरावा नाही
  • समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गात येतात - जात पडताळणी समिती

जात पडताळणी समितीने केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. समितीने नवाब मलिक यांच्यासह चौघांचे म्हणणे फेटाळले आहे. समीर वानखेडेंनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा ठोस पुरावा नाही असा निर्वाळा जात पडताळणी समितीने दिला. ( sameer wankhede belong from scheduled caste community says mumbai caste scrutiny committee )

समीर वानखेडे मुस्लिम आहेत त्यामुळे हिंदू धर्मातील विशिष्ट समाजासाठीच्या आरक्षणाचा लाभ त्यांना मिळू शकत नाही असा दावा तक्रारदारांनी केला होता. नवाब मलिक यांच्यासह चार जणांनी तक्रार केली होती. या तक्रारींच्या आधारे तपास करून जात पडताळणी समितीने समीर वानखेडे यांना दिलासा दिला.

समीर वानखेडे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा ठोस पुरावा नाही. वानखेडे यांनी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नियमानुसार अर्ज केला होता. यामुळे त्यांच्याविरोधातील मुस्लिम धर्म स्वीकारला म्हणून आरक्षणाचा लाभ देऊ नये ही तक्रार गैरलागू ठरते, असा निर्वाळा जात पडताळणी समितीने दिले.

मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला. बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा वानखेडेंवरील आरोप समितीने फेटाळला. 

जात पडताळणी समितीच्या निर्णयाचे समीर वानखेडे यांची पत्नी आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने स्वागत केले. तर जात पडताळणी समितीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत आहोत, अशी माहिती तक्रारदारांच्या वकिलाने दिली.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नेमके काय सांगितले?

  1. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नाही
  2. समीर वानखेडे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा ठोस पुरावा नाही
  3. समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गात येतात
  4. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्मामध्ये विधीवत धर्मांतर केले नाही
  5. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचे सिद्ध झाले
  6. समीर वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य नाही

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी