Sameer Wankhede case | 'पिक्चर अभी बाकी है, मेरा रोल भी अभी बाकी है', असे म्हणत रामदास आठवलेंची एन्ट्री

मुंबई
विजय तावडे
Updated Oct 31, 2021 | 16:10 IST

Ramdas Athawale : समीर वानखेडे आणि क्रांती रेड यांच्या पाठिशी मी उभा आहे. ते बाबासाहेबांचे अनुयायी असून महारच आहेत. ते मुसलमान नाहीत. समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे. त्यांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे.

Sameer Wankhede case
समीर वानखेडे प्रकरण 
थोडं पण कामाचं
  • वानखेडे प्रकरणाला रोजच नवे वळण
  • खासदार रामदास आठवले यांची या प्रकरणात एन्ट्री
  • समीर वानखेडे आणि क्रांती रेड यांच्या पाठिशी मी उभा, रामदास आठवलेंची भूमिका

Sameer Wankhede case | मुंबई: समीर वानखेडे प्रकरणाला रोजच नवे वळण लागत आहे. नवाब मलिक (Nawab Malik) समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत तर समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबिय त्यांची बाजू मांडत आहेत. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या मीडियासमोर त्यांच्या कुटुंबाची बाजू मांडताना दिसत आहेत. समीर वानखेडे  (Sameer Wankhede )यांनी मागासवर्गीय आयोगाकडेदेखील धाव घेतली आहे. आता समीर वानखेडे प्रकरणात (Sameer Wankhede case) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (RPI President) आणि खासदार रामदास आठवले यांची या प्रकरणात एन्ट्री झाली आहे. रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी आज  क्रांती रेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर रामदास आठवले हे प्रसार माध्यमांनादेखील समोर गेले.  (Sameer Wankhede case: Ramdas Athawale stand by Wankhede family, says Nawab Malik's allegations are false)

वानखेडेंच्या पाठिशी आठवले

क्रांती रेडकर (Kranti Redkar)यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की 'क्रांती रेडकर यांनी मला विनंती केली आहे. आपण समाजाचे नेते आहात, आंबेडकरांचे अनुयायी आहात. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही आमच्या पाठिशी उभे राहा.' आठवले पुढे म्हणाले की त्यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांच्या पाठिशी उभा आहे. समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. नवाब मलिक यांनी म्हटले होते की पिक्चर अभी बाकी आहे. मात्र त्या पिक्चरमध्ये मी येणे अजून बाकी आहे. क्रांती रेडकर माझ्या घरी आली, त्यामुळे आता मलाही पिक्चरमध्ये काम करावे लागेल, असे पुढे रामदास आठवले म्हणाले.

नवाब मलिक पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप

समीर वानखेडे आणि क्रांती रेड यांच्या पाठिशी मी उभा आहे. ते बाबासाहेबांचे अनुयायी असून महारच आहेत. ते मुसलमान नाहीत. समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे. त्यांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. वानखेडे कुटुंबियांनी मला सर्व कागदपत्रे दाखवलेली आहेत. नवाब मलिक करत असलेले सर्व आरोप खोट आहेत. समीर वानखेडेंवर जाणीवपूर्वक आरोप करण्यात येत आहेत. नवाब मलिक यांच्या जावयाला समीर वानखेडेंनी अटक केल्यामुळे आणि त्याला आठ महिने तुरुंगात ठेवल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्या पदाचा गैरवापर करून रोज गंभीर आरोप करत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब हे मुसलमान नसून दलितच आहे, असा दावादेखील रामदास आठवले यांनी केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नवनवीन माहिती, व्हिडिओ प्रसार माध्यमांसमोर आणत आहेत. नवाब मलिक यांनी काशिफ खानचा क्रूझवर धमाल डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही व्यक्ती ड्रग्सच्या तस्करीत आणि सेक्स रॅकेटशी संबंधित असून काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचे जवळचे संबंध आहेत असाही आरोप मलिक यांनी केला आहे. आर्यन खान याला जामिन मिळाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष समीर वानखेडे यांच्यावर केंद्रीत झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी