Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंना अटक होण्याची शक्यता, शरद पवारांशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची चर्चा

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 10, 2021 | 08:39 IST

Aryan Khan Drugs Case :नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Bureau of Narcotics Control) (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Mumbai Divisional Director Sameer Wankhede) यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Sameer Wankhede likely to be arrested
Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंना अटक होण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • समीर वानखेडेंच्या अटकेनंतर राज्य आणि केंद्राचा वाद पेटण्याची शक्यता
  • वानखेडेंच्या विरोधात मुंबई पोलिसांत चार तक्रारी दाखल
  • समीर वानखेडेंच्या अटकेसाठी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या चर्चा

Aryan Khan Drugs Case : मुंबई :  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Bureau of Narcotics Control) (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Mumbai Divisional Director Sameer Wankhede) यांना अटक होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यात मंगळवारी तासभर चर्चा झाली. या चर्चेत याविषयावरची चर्चा झाल्याचं सांगितल्या जात आहे. दरम्यान वानखेडे यांच्यावर अटकेची कारवाई केल्यास राज्य आणि केंद्रातील संबंध मात्र ताणले जाणार आहेत. 

समीर वानखेडे केंद्राच्या सेवेत आहेत. मात्र त्यांच्याविषयी मुंबई पोलिसांकडे ४ तक्रारी आहेत. विशेष करून आर्यन खान अटकप्रकरणी १८ कोटींची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चार सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. समीर वानखेडे यांनी मध्यंतरी उच्च न्यायालयात धाव घेऊन राज्य सरकारच्या एसआयटी स्थापनेला विरोध केला होता. पवार आणि वळसे यांच्या ‘सिल्व्हर ओक’ येथील भेटीदरम्यान मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते. मुंबई पोलिसांनी नेमलेल्या एसआयटीचे नेतृत्व एसीपी मिलिंद खेतले करत आहेत.

वसुली घोटाळ्याची चौकशी करत आहे SIT

ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांची एसआयटी वसुली प्रकरणाचा तपास करत आहे. माध्यमाला सांगितल्याप्रमाणे एसआयटीला अद्याप तपासात समीर वानखेडे किंवा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आलेला नाही, दरम्यान अजून तपास सुरू आहे.

एनसीबीच्या नावावर वसुलीचा खुलासा

मुंबई पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या (एनसीबी) नावाने काही जणांनी निश्चितपणे वसुली केल्याचे एसआयटीला माहिती मिळली आहे. यामध्ये किरण गोसावी यांचे सर्वात मोठे नाव समोर येत आहे. 

असा होता किरण गोसावीचा प्लान 

किरण गोसावी आणि त्याचे काही साथीदार स्वत:ला एनसीबी अधिकारी असल्याचं सांगत वसुली करायचे. किरण गोसावीने मोठ्या चालाखीने आर्यन खानसोबत सेल्फी घेतला आणि त्यानंतर आर्य़न खानची ऑडिओ क्लिप मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. इतकचं नाही तर जेव्हा आर्यन खानला एनसीबी कार्यालयात आणलं होतं तेव्हा गोसावीला माध्यमांची उपस्थिती माहिती होती. त्या परिस्थितीचा फायदा घेत आर्यन खानचा हात पकडून त्याने एनसीबी कार्यालय गाठलं.

जेणेकरून टेलिव्हिजनवर तो एनसीबी अधिकारी असल्याचं भासेल. त्यानंतर लोअर परेल भागात किरण गोसावीने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला भेटून तिला पुरावे दाखवले. ज्याच्या आधारे त्यांनी ददलानी असं भासवलं की तो एक अधिकारी आहे तो आर्यन खानला बाहेर काढू शकेल. मॅनेजर पूजा दादलानी हिने के. पी. गोसावी आणि सॅम डिसोझा यांच्याशी १८ कोटींच्या लाचेसंदर्भात बोलणी केली होती. त्यासंदर्भातले ठोस पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले असल्याचे समजते. याचा धागा वानखेडेंपर्यंत जाईल, असे सांगण्यात येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी