Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्स प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवलं

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 05, 2021 | 19:44 IST

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी या ड्रग्स प्रकरणावरून अनेक आरोप केले आहेत.

Sameer Wankhede
समीर वानखेडे 

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी या ड्रग्स प्रकरणावरून अनेक आरोप केले आहेत. आर्यन खानला सोडविण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील झाल्याचा आरोप किरण गोसावी याचा अंगरक्षक प्रभाकर साईल याने केले होते. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांना शाहरुख खानची मॅनेजर आणि सॅम डिसोझा यांच्या कारचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. साईलच्या म्हणण्यानुसार लोअर परेल जवळ ही डील झाली होती. पोलिसांच्या हाती आलेल्या फुटेजही तेथील आहेत. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी