sameer wankhede समीर वानखेडेंना 'यांनी' दिला भक्कम पाठिंबा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 03, 2021 | 15:13 IST

sameer wankhede supported by ramdas athavale, aurn haldar and shiv pratishthan नवाब मलिक एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोपांची राळ उडवत आहे. पण समीर वानखेडे यांना काही व्यक्ती आणि संस्थांकडून भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

sameer wankhede supported by ramdas athavale, aurn haldar and shiv pratishthan
समीर वानखेडेंना 'यांनी' दिला भक्कम पाठिंबा 
थोडं पण कामाचं
  • समीर वानखेडेंना 'यांनी' दिला भक्कम पाठिंबा
  • समीर वानखेडे यांना काही व्यक्ती आणि संस्थांकडून भक्कम पाठिंबा
  • नवाब मलिक एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करत आहेत - नितीन चौगुले

sameer wankhede supported by ramdas athavale, aurn haldar and shiv pratishthan । मुंबईः महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोपांची राळ उडवत आहे. पण समीर वानखेडे यांना काही व्यक्ती आणि संस्थांकडून भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र योग्य असल्याचे सांगत त्यांना भक्कम पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी समीर वानखेडेंच्या कुटुंबातील सदस्यांनी भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भेटले. या भेटीवेळी वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र दाखवले, तसेच ते दलित हिंदू असल्याचे सर्व पुरावे दिले. तेव्हा आठवले यांनी समीर वानखेडे यांना भक्कम पाठिंबा दिला. आता श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान नावाच्या संघटनेने समीर वानखेडे यांना भक्कम पाठिंबा दिला. यामुळे वानखेडेंना मिळत असलेल्या पाठिंब्यात वाढ होत असल्याचे चित्र आहे.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह एनसीबी ऑफिस बाहेर समीर वानखेडेंचा सत्कार केला. यावेळी समीर वानखेडेंवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली. तसेच समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या प्रसंगी संघटनेकडून समीर वानखेडेंना शिवाजी महाराजांची एक प्रतिमा भेट देण्यात आली. समीर वानखेडेंनी या सर्व गोष्टींचा स्वीकार केला पण प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यानंतर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. 

नवाब मलिक एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करत आहेत. अंमली पदार्थ्यांच्या व्यवसायाला पाठिशी घालणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. यामुळे नवाब मलिक यांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना आंदोलन करत राहणार, असे संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले म्हणाले.

याआधी नवाब मलिकांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात, असा आरोप केला होता. नवाब मलिक यांचा हा आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी