Sameer Wankhede समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात केला सव्वा कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 07, 2021 | 10:57 IST

Sameer Wankhede's father files defamation suit against Nawab Malik, sought Rs 1.25 crore compensation समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वडिलांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी बदनामी केल्याचा आरोप करुन भरपाई म्हणून वानखेडेंच्या वडिलांनी सव्वा कोटी रुपयांची मागणी केली आहे.

Sameer Wankhede's father files defamation suit against Nawab Malik, sought Rs 1.25 crore compensation
समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात केला सव्वा कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा 
थोडं पण कामाचं
  • समीर वानखेडेंच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात केला सव्वा कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा
  • ज्ञानदेव वानखेडे यांच्या दाव्यामुळे नवाब मलिक यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता
  • दाव्याची पहिली सुनावणी उद्या (सोमवार ८ नोव्हेंबर २०२१) होण्याची शक्यता

Sameer Wankhede's father files defamation suit against Nawab Malik, sought Rs 1.25 crore compensation । मुंबईः एनसीबीच्या मुंबई कार्यालयात कार्यरत असलेले झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वडिलांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी बदनामी केल्याचा आरोप करुन भरपाई म्हणून वानखेडेंच्या वडिलांनी सव्वा कोटी रुपयांची मागणी केली आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या दाव्यामुळे नवाब मलिक यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची पहिली सुनावणी उद्या (सोमवार ८ नोव्हेंबर २०२१) होण्याची शक्यता आहे. दाव्याचा निकाल जाहीर होईपर्यंत नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास, प्रेस कॉन्फरन्स घेण्यास, वानखेडे कुटुंबाविरोधात लिहिण्यास सक्त मनाई करावी तसेच वानखेडे कुटुंबाविरोधात मलिक यांनी आधी काही लिहिले-बोलले असल्यास ते साहित्य हटविण्यात यावे; अशा स्वरुपाची मागणीही ज्ञानदेव वानखेडे यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री असलेले नवाब मलिक सातत्याने समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात आरोपांची राळ उडवत आहेत. समीर वानखेडे खंडणी वसुली करतात, ते महागडे कपडे वापरतात, त्यांची जात आणि धर्म आदी मुद्यांवरुन नवाब मलिक वारंवार सार्वजनिक वक्तव्य करत आहेत. समीर वानखेडे हे एक सरकारी अधिकारी आहेत. ते तपास करत असलेल्या केसविषयी संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांनी आरोपांच्या माध्यमातून केला. या प्रकाराविरोधात समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्यीय आयोगाकडे दाद मागितली आहे. आता समीर वानखेडे यांच्या वडिलांनी थेट न्यायालयात धाव घेऊन नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी