नवाब मलिकांच्या आरोपांना क्रांती रेडकर वानखेडेचे ट्वीटने उत्तर

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 18, 2021 | 17:51 IST

sameer wankhedes wife kranti redkar wankhede replied nawab malik on his allegation via tweet समीर वानखेडे यांनी दोन शाळा सोडल्याचे दाखले महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केले. हे दाखले दाखवून मलिक यांनी वानखेडे मुस्लिम आहेत असे सांगितले. मलिक यांचा दावा खोडून काढत समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी ट्वीट केले

sameer wankhedes wife kranti redkar wankhede replied nawab malik
नवाब मलिकांच्या आरोपांना क्रांती रेडकर वानखेडेचे ट्वीटने उत्तर 
थोडं पण कामाचं
  • नवाब मलिकांच्या आरोपांना क्रांती रेडकर वानखेडेचे ट्वीटने उत्तर
  • मलिक यांचा दावा खोडून काढत समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले ट्वीट
  • नवाब मलिक यांच्या दाव्यात तथ्य नाही - क्रांती रेडकर वानखेडे

sameer wankhedes wife kranti redkar wankhede replied nawab malik on his allegation via tweet मुंबईः 'पुरोगामी' महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाचे नेते-प्रवक्ते सरकारी अधिकाऱ्याच्या जात आणि धर्माचे विश्लेषण करण्यात गुंतले आहेत. आज (गुरुवार १८ नोव्हेंबर २०२१) एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन शाळा सोडल्याचे दाखले महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केले. हे दाखले दाखवून मलिक यांनी वानखेडे मुस्लिम आहेत असे सांगितले. मलिक यांचा दावा खोडून काढत समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी ट्वीट केले. नवाब मलिक यांच्या दाव्यात तथ्य नाही, असे सांगत क्रांती रेडकर वानखेडे यांनी समीर वानखेडे 'हिंदू महार' असल्याचे सांगितले.

एकूण किती संपती आहे समीर वानखेडेंकडे

समीर वानखेडे यांनी सेंट जोसेफ आणि सेंट पॉल या दोन शाळा सोडल्या. या शाळांच्या दाखल्यामध्ये मुस्लिम असा धर्माचा उल्लेख आहे पण जातीचा उल्लेख नाही. हे दाखले पाहता वानखेडे मुस्लिम आहेत, असे नवाब मलिक म्हणाले. मलिक यांच्या या दाव्याला क्रांती रेडकर वानखेडे यांनी ट्वीट करुन उत्तर दिले.

वाईट विचारातून समीर वानखेडे यांच्याविषयीची अर्धवट माहिती प्रसिद्ध करुन त्यांना बदनाम केले जात आहे. कागदपत्रांमधील चुकीचे उल्लेख दुरुस्त करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी १९८९ मध्ये चुकीचे उल्लेख दुरुस्त करुन घेतले; असे क्रांती रेडकर वानखेडे यांनी ट्वीट करुन सांगितले.

मुंबईच्या उच्च न्यायालयात नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या विरोधात एका याचिकेची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीसाठी नवाब मलिक यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे सादर केली आहेत. आता उच्च न्यायालय या संदर्भात पुढील निर्णय देईल. उच्च न्यायालयाचा निर्णय वानखेडे यांच्या बाजूने आला तर त्यांची नोकरी सुरक्षित राहील अन्यथा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी