Samruddhi Mahamarg : मुंबई : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास निगमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी ही माहिती दिली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूरला जोडणार आहे. (Samruddhi Mahamarg highway first phase complete inaugurate by prime minister narendra modi soon )
समृद्धी महामार्गाच्या नामकरणावर शिक्कामोर्तब
राधेश्याम मोपलवार म्हणाले की समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर्पर्यंत ४८० किमी क्षेत्रात पसरला आहे. १५ ऑगस्टपर्यंत या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.
Bullet train : नागपूर-समृद्धी महामार्गानेच येणार बुलेट ट्रेन, रावसाहेब दानवेंकडून अहवालाची तयारी
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वीच प्रशासनाने या भागात रुग्णावाहिका तैनात करण्यात आली आहे. टोल कलेक्शन सिस्टम, पेट्रोल पंपही महामार्गावर बांधण्यात आल्याचे मोपलवार यांनी सांगितले. २०२३ मे महिन्यात ७०० किमी भागाचे काम पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या २००८ च्या अधिसूचनेत एक सूत्र देण्यात आले आहे. या सुत्रानु्सार प्रवाशांकडून १.७२ रुपये प्रतिकिमी दराने टोल आकारले जाईल. या महामार्गाची निर्मिती प्रतिताशी १५० किमी या वेगाने करण्यात आली आहे. असे असले तरी या महामार्गावर ताशी १२० किमी वेगाचा नियम ठेवण्यात आला आहे
या महामार्गावर प्रतिदिन २५ हजार वाहने धावतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जेव्हा हा महामार्ग भिवंडीशी जोडला जाईल तेव्हा दिवसाला गाड्यांची संख्या १ लाखहून अधिक होईल असेही सांगितले जाते. मुंबई पुणे महामार्ग सुरू झाला तेव्हा दिवसाला गाड्यांची संख्या १५ हजार इतकी होती. या महामार्गावर दिवसाला १ लाख २५ गाड्या धावतात.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.