Attack on Sandeep Deshpande : हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंनी पोलीस सुरक्षा नाकारली, म्हणाले…

Sandeep Deshpande Attack | मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना दोघांनी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांची पहिलीच पत्रकार परिषद घेतली.

Sandeep Deshpande rejected police security
Attack on Sandeep Deshpande : हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंनी पोलीस सुरक्षा नाकारली, म्हणाले…  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मनसे नेते संदीप देशपांडेवर दोघांकडून हल्ला
  • हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
  • संदीप देशपांडे यांनी सिक्युरिटी नाकारली

मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना काल (3 मार्च) चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला झाला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्यांना तत्काळ प्रभावाने पोलीस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, देशपांडेंनी ही सुरक्षा नाकारली आहे. (Sandeep Deshpande rejected police security)

अधिक वाचा : Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेज आले समोर, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, मी सरकारचा आभारी आहे पण मी विनम्रतापूर्वक सांगू ईच्छितो की मला सिक्युरिटी ची गरज नाही, मी कोणाला घाबरत नाही.आम्हाला हे कोणी केलं त्यांची नावं कळाली आहेत.आता खरी सिक्युरिटीची गरज त्यांना आहे"

अधिक वाचा : Nagpur : नागपूर पालिकेचा 'हिट अ‍ॅक्शन प्लॅन'; 15 मार्चपासून शाळा सकाळी भरवणार

मनसेचे नेते संदीप देशपांडे हे शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना दोघांनी स्टम्प्सच्या सहाय्याने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला.

अधिक वाचा : HSC Exam Maths Paper Leak: 12वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा होणार? शिक्षण मंडळाने दिली महत्त्वाची माहिती

हल्लानंतर ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर आज पोलिसांनी भांडूप परिसरातून दोघांना अटक करण्यात आली. त्यापैकी अशोक खरात हे शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी