मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (pooja chavan sucide case) संजय राठोड (sanjay rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर सदर आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. दरम्यान, सदर प्रकरणात भारतीय जनता पार्टीने (bjp) देखील राठोड यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली होती. दरम्यान, राठोड यांचा राजीनामा देखील मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान, सकाळपासून सदर घटनेवर मोठ्या हालचाली सुरु होत्या. संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thakre) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी राठोड यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली असून, राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन आपले म्हणणे मांडले आहे.
मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरुणी होती जिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पूजा चव्हाण हिच्या मृत्युवरून विरोधी पक्षाने प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जर घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. दरम्यान मीडियाच्या माध्यमातून माझी आणि समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार देखील झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना राठोड म्हणाले की, गेल्या ३० वर्षातील माझ काम उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. मी याआधी देखील बोललो होतो या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि आता देखील हीच माझी मागणी आहे. त्याचबरोबर मी बाजूला राहून याचा तपास व्हावा ही देखील माझी मागणी आहे. त्याचबरोबर खर सत्य बाहेर यावं असं मी मुख्यमंत्र्यांना बोलून माझा राजीनामा दिलेला आहे असं राठोड म्हणाले.
माझी सातत्त्याने मागणी राहिली आहे की, तपास होऊद्या. पोलीस चौकशी करत आहेत. जे सत्य आहे ते बाहेर येउद्या अशी माझी भूमिका होती. परंतु ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीने आम्ही अधिवेशन आम्ही चालू देणार नाही. असं विरोधकांकडून केलं गेले. हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या विरोधात आहे. लोकशाहीच्या विरोधात आहे. खरतर पहिल्यांदा कोणत्याही घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर परिणाम भोगले पाहिजेत. मात्र, जे विरोधक आहेत त्यानी मात्र आम्ही आदिवेशन चालू देणार नाही. हे अयोग्य आहे. मात्र, यामुळे माझ्या या ठिकाणी वैयक्तिक जीवनामध्ये आणि समाजावर परिणाम झाला. त्यामुळे मी या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आणि चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आणि तपास देखील योग्य झाला पाहिजे असं राठोड म्हणाले आणि निघून गेले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री अनिल परब देखील सोबत होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.