Sanjay Raut: "खासदार श्रीकांत शिंदेंकडून जीवे मारण्याची धमकी" संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 21, 2023 | 17:14 IST

Death threat to Sanjay Raut: संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. 

Sanjay Raut
Sanjay Raut: "खासदार श्रीकांत शिंदेंकडून जीवे मारण्याची धमकी" संजय राऊतांचा आरोप 
थोडं पण कामाचं
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
  • शिंदे गटाकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा राऊतांचा आरोप
  • खासदार श्रीकांत शिंदे यांनी जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा राऊतांचा आरोप

Sanjay Raut received death threat: उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. इतकेच नाही तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हे पण वाचा : दररोज एक संत्री खायला हवी का?

संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात आपल्याला मिळत असलेल्या धमक्यांबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हे पण वाचा : Exam Tips:परीक्षेच्या वेळी करू नका या चुका

संजय राऊतांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय? 

आपल्या पत्रात संजय राऊत यांनी म्हटलं, "गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी