Sanjay Raut : सर्वात मोठ्या लोकशाहीचे पाय आणि पंख कापण्याचे प्रयत्न, संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

मुंबईत संसदेत अनेक शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचार, आंदोलनजीवी, गद्दार. संसदेत परखड शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे, गुळगुळीत शब्द चालतील. अशा प्रकारे शब्दांवर बंदी आणणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

थोडं पण कामाचं
  • मुंबईत संसदेत अनेक शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचार, आंदोलनजीवी, गद्दार. संसदेत परखड शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे
  • अशा प्रकारे शब्दांवर बंदी आणणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.
  • सर्वात मोठ्या लोकशाहीचे पाय आणि पंख कापण्याचे प्रयत्न

Sanjay Raut : मुंबई : मुंबईत संसदेत अनेक शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचार, आंदोलनजीवी, गद्दार. संसदेत परखड शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे, गुळगुळीत शब्द चालतील. अशा प्रकारे शब्दांवर बंदी आणणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सर्वात मोठ्या लोकशाहीचे पाय आणि पंख कापण्याचे प्रयत्न असेही राऊत म्हणाले.  

मुंबईत राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा राऊत म्हणाले की, संसदीय लोकशाहीवर हा जबरदस्त हल्ला आहे. उद्या काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. संसदेच्या आवारात विरोध दर्शवण्यासाठी अनेक पक्षाचे खासदार आणि नेते आंदोलन करायचे, गांधीजींच्या पुतळ्याजवळ आम्ही आंदोलन करायचो, त्यावरही बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या सरकारला लोकशाहीची भिती वाटत असेल तर देशात या लोकशाहीचा सर्वात मोठा धोका आहे. हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहे. अशा वेळी लोकप्रतिनिधी परखड शब्दांत जनतेचे प्रश्न मांडत आहेत, त्यांची अशी मुस्कटदाबी करण्यात आली आहे. भारतात सध्या लोकशाही आहे की नाही असा प्रश्न जगाला पडेल असेही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असे आपण म्हणतो, परंतु याच लोकशाहीचे पंख आणि पाय कापायचे प्रयत्न सुरू आहे. यात जर सध्याचे सत्ताधारी यशस्वी झाले तर ते पुढील पाऊल टाकू शकतात असेही राऊत यांनी नमूद केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी