Sanjay Raut : मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून कामात सक्रिय झाले आहेत, परंतु विरोधी पक्षाने अतिशय भावनाशुन्य आणि नामर्दपणे टीका केली अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोत्या मनाचा झाला आहे असेही राऊत म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांनो उघडा डोळे बघा नीट, ज्या प्रमाणे राज्यातील विरोधी पक्षाने भावनाशून्य होऊन मुख्यमंत्र्यांच्या आजरावर टीका केली, भाष्य केले, टिप्पण्णी केली. ही बाब राजकीय नितिमत्तेला आणि माणूसकीला धरून नाही. राज्याचे मुख्यमंत्री आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. विरोधीपक्षाने नार्मदपणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली. या नामर्दपणाला महाराष्ट्राच्या जनतेने उत्तर दिले आहे असे राऊत म्हणाले.
तसेच गेल्या २ दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामात आणि सार्वजनिक कामात सक्रिय झाले आहेत. आज वर्षा बंगल्यावर त्यांनी तिरंगा फडकावला. आज शिवाजी पार्कात संचलनायाला त्यांनी हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नामर्दापणाची टीका केली, त्यांना चांगलीच चपराक बसली आहे, तसेच त्यांच्या अंतरंगात किती घाण आणि कचरा आहे, हे सुद्धा स्पष्ट झाले आहे, असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री हे बरे होत आहेत आणि लवकरच ते कामाला सुरूवात करतील हे मी वारंवार सांगत होतो. आजारपण कुणाला आणि कधी येईल हे सांगता येत नाही. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा जेव्हा आजारी होते तेव्हाही त्यांची आम्ही काळजी घेत होतो. माननीय शरद पवार जेव्हा आजारी होते तेव्हाही काळजीने आम्ही त्यांची विचारपूस केली. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा राहिलेली आहे. विरोधी पक्षाने राज्यात एक प्रकारची नामर्दानगी आणली आहे. विरोधी पक्षाकडून मोठ्या मनाचे राजकारणाचा र्हास झाला असून विरोधी पक्ष कोत्या मनाचा झाला आहे असेही राऊत यांनी नमूद केले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.