Kirit Somaiya On ED Raids :मुंबई : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणल्यानंतर भाजपचे माजी खासदार (Former BJP MP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि संजय राऊतांवर त्यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना याची चाहुल आधीच लागली असावी यामुळे त्यांनी नौटंकी सुरू केली होती, असा टोलाही सोमय्यांनी लगावला आहे.
संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी गैरव्यवहार समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईतून वाचण्यासाठी संजय राऊत यांची धडपड सुरू होती. मात्र, आता या प्रकरणात आणखी कारवाई होणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील पैसे प्रवीण राऊत, संजय राऊत आणि वर्षा राऊत यांनी वापरले असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. या कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, ईडी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
Read Also : Raj Thackeray become Grandfather : राज ठाकरे झाले आजोबा
गेल्या दोन महिन्यांपासून राऊत धावपळ सुरू होती, पत्र लिहिलं जात होतं. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही,' असं सोमय्या यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. तसंच यावेळी किरीट सोमय्या यांनी त्यांच्या दिल्ली भेटीबाबतही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.संजय राऊत यांचे स्नेही आणि व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राऊत यांनी धावपळ सुरू केली होती. राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात मोठी रक्कम कशी आली, याची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली होती. प्रवीण राऊत प्रकरणातही संजय राऊत यांची काय भूमिका आहे, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणीही मी दिल्लीत ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून केली होती,' असा खुलासा सोमय्या यांनी केला.
Read Also : शिवसेनेची योजना ठरली फेल; मोदी सरकारची ही योजना करणार लागू
पुढे पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांनी पीएनबी घोटाळा प्रकरणात ईडीकडे 10 महिन्यांआधी 55 लाख रुपये जमा केले होते. संजय राऊत यांची ही कृती म्हणजे घोटाळ्यात सहभाग असल्याची कृती आहे. तेव्हा मी ईडीला सांगितलं होतं की, म्हणजे यांनी गुन्हा कबुल केला आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईची कल्पना संजय राऊत यांना होती. त्यामुळे त्यांनी किरीट सोमय्या, नील सोमय्यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यांची ही धडपड, मानसिकता समजू शकतो असेही त्यांनी म्हटले.
आपल्यावर ईडीची कारवाई होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना आला होता. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक झाली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. ईडी अधिकाऱ्यांचे तोंड बंद करता येईल असे महाराष्ट्र सरकारला वाटत होते. मात्र, आता आणखी कारवाई होणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले. पोलिसांचा माफिया म्हणून वापर करून कारवाई टाळता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
ईडी अधिकाऱ्यांवर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. या मुद्यावरून सोमय्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांच्या प्रकरणाची माहिती त्यांनी घ्यावी आणि कारवाई अशी मागणीदेखील सोमय्यांनी केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.