मुंबईः शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) पत्रकार परिषद (Press conference) घेऊन भाजप आणि ईडीविरोधात रणशिंग फुंकणारे शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर अखेर सक्तवसुली संचलनालयाने (ED) टाच आणली आहे. संजय राऊत यांची अलिबागमधील (Alibag) संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी (Patrachal land scam) ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅटचा समावेश आहे. या पत्राचाळ जमीन घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरले म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईवरून आता पुन्हा एकदा मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
Read Also : Raj Thackeray become Grandfather : राज ठाकरे झाले आजोबा
पत्राचाळ जमीन प्रकरणात 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे कथितरित्या संजय राऊत यांना मिळाले होते. या भूखंडांची किंमत जवळपास 60 लाख रुपये आहे. स्थनिकांना धमकावून कमी पैशात हा भूखंड घेण्यात आला, असेही आरोप राऊत यांच्यावर करण्यात आले आहेत. गोरेगावमध्ये गुरूआशिष कंपनीला पुनर्विकासांचे काम देण्यात आले होते. मात्र संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊतांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीने या जागेतील FSI परस्पर विकले होते. असे प्रथमदर्शनीत समोर आले होते.
याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती. याशिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.
Read Also : करा स्वस्तात सोने खरेदी...आज घसरणीने पुन्हा स्वस्त झाले सोने
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी थेट ईडीवर आरोप केले होते. ईडीचे मोठे अधिकारी भाजपचे तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत. ज्या ईडी अधिकाऱ्याने निवडणूक लढवली त्याने 50 जणांचा खर्चही केला. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे. मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करतो. खंडणीच्या बाबतीतला सगळा कच्चाचिठ्ठा पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. तुम्ही स्वच्छ भारत अभियान हे काही फक्त कचरा साफ करण्यासाठी नाही. तर भ्रष्टाचारही साफ करायला हवा, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला होता. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या अटकेची मागणी केली आहे. ईडीने त्यांच्याविरुद्ध PMLA कायद्यांतर्गत कारवाई केली. अर्थातच त्यांनी भ्रष्टाचार झाला. आता त्यांना महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांप्रमाणे तुरुंगात टाकायला हवे अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.