संजय राऊतांच्या 'या' फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण 

मुंबई
Updated Jan 01, 2020 | 16:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sanjay Raut Facebook post: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

sanjay raut facebook post shiv sena mp cm uddhav thackeray sunil raut cabinet expansion maharahshtra politics news marathi google
संजय राऊत (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • मंत्रिमंडळात आमदार सुनील राऊत यांना स्थान न मिळाल्याने संजय राऊत असल्याची चर्चा
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली फेसबुक पोस्ट 
  • राऊतांच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण 

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी (३० डिसेंबर) रोजी मुंबईत झाला. या मंत्रिमंडळात शिवसेना आमदार सुनील राऊत यांना स्थान मिळाले नाही. आपल्या लहान भावाला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने खासदार संजय राऊत हे नाराज झाल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरु असतानाच आता संजय राऊत यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

संजय राऊत यांची फेसबुक पोस्ट 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी लिहिलं आहे की, "हमेशा ऐसे व्यक्ती को संभाल के रखिये, जिसने आपको ये तीन भेंट दी हो, साथ, समय और समर्पण". संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या असून चर्चांना उधाण आले आहे.

संजय राऊत नाराज असल्याची चर्चा रंगली असतानाच प्रसारमाध्यमांनी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत संजय राऊत यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच आपण पक्षासाठी काम करतो असेही त्यांनी म्हटले होते. पण त्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत समसमान वाटा मिळावा यासाठी शिवसेनेने भाजपकडे मागणी केली होती. यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेकडून एकट्यानेच भूमिका मांडत मागणी लावून धरली होती. भाजपसोबत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर संजय राऊत यांनीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. संजय राऊत यांनी बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेमुळे त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी अपेक्षा होती मात्र, सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारालाही संजय राऊत हे गैरहजर होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी